घरक्रीडाUEFA EURO : जर्मनीच्या खेळाडूचा स्वयं गोल, फ्रान्सचा विजय

UEFA EURO : जर्मनीच्या खेळाडूचा स्वयं गोल, फ्रान्सचा विजय

Subscribe

युरो स्पर्धेत जर्मनीने पहिल्यांदाच आपला सलामीचा सामना गमावला.

विश्वविजेत्या फ्रान्सला युरो २०२० फुटबॉल स्पर्धेची विजयी सुरुवात करण्यात यश आले. मॅट्स हुमेल्सच्या स्वयं गोलमुळे फ्रान्सने यंदाच्या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात जर्मनीचा १-० असा पराभव केला. जर्मनीला घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे युरो स्पर्धेत त्यांनी आपला सलामीचा सामना पहिल्यांदाच गमावला. फ्रान्सने मात्र भक्कम बचाव करत हा सामना जिंकला. ‘आम्ही जर्मनीवर वर्चस्व गाजवले असे नाही. मात्र, आम्ही भक्कम बचाव केला. आक्रमणात आम्हाला अधिक चांगला खेळ करता आला असता,’ असे सामन्यानंतर फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर डेशॉम्प म्हणाले.

- Advertisement -

ल्युकास हर्नांडेसचा उत्कृष्ट पास

फ्रान्स आणि जर्मनी या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील दोन बलाढ्य संघांतील सामन्याची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. या सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ केला. परंतु, २० व्या मिनिटाला ल्युकास हर्नांडेसचा उत्कृष्ट पास रोखण्यात जर्मनीचा बचावपटू मॅट्स हुमेल्सला अपयश आले. त्याने चेंडू चुकीने गोलजाळ्यात मारल्याने फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळाली. जर्मनीला यानंतर पुनरागमन करता आले नाही. त्यामुळे फ्रान्सने हा सामना १-० असा जिंकला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -