घरक्रीडाEuropa League : मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा धक्का देत विलारेयालला जेतेपद

Europa League : मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा धक्का देत विलारेयालला जेतेपद

Subscribe

विलारेयालने पेनल्टी शूट-आऊटमध्ये ११-१० अशी बाजी मारली.

विलारेयालने अंतिम सामन्यात पेनल्टी शूट-आऊटमध्ये मँचेस्टर युनायटेडवर ११-१० अशी मात करत युएफा युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. स्पॅनिश संघ विलारेयालची युरोपा लीग स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. अंतिम सामन्यामध्ये ९० मिनिटांचा नियमित वेळ, तसेच ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेअंती मँचेस्टर युनायटेड  आणि विलारेयाल यांच्यात १-१ अशी बरोबरी होती. त्यामुळे सामन्याचा विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूट-आऊट खेळवावे लागले. यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी उत्कृष्ट पेनल्टी मारल्याने १०-१० अशी बरोबरी झाली होती. त्यानंतर विलारेयालचा गोलरक्षक रुलीने गोल केला आणि युनायटेडचा गोलरक्षक डाविड ड गेयाने मारलेली पेनल्टी अडवली. त्यामुळे विलारेयालने शूट-आऊटमध्ये ११-१० अशी बाजी मारत अंतिम सामना जिंकला आणि या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

कवानीच्या गोलमुळे बरोबरी

या सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांना फारसा चांगला खेळ करता आला नाही. परंतु, २९ व्या मिनिटाला विलारेयाल संघाला फ्री-किक मिळाली. डॅनी परेहोच्या पासवर जेरार्ड मोरेनोने गोल करत विलारेयालला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात युनायटेडने त्यांच्या खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. ५५ व्या मिनिटाला स्कॉट मॅकटोमिनेच्या पासवर एडींसन कवानीने गोल करत युनायटेडला १-१ अशी बरोबरी करून दिली. ही बरोबरी ९० मिनिटांचा नियमित वेळ, तसेच ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेअंती कायम राहिली.

- Advertisement -

पेनल्टी शूट-आऊटमध्ये ११-१० अशी बाजी

त्यानंतर पेनल्टी शूट-आऊट खेळवण्यात आले. यात विलारेयालच्या सर्व खेळाडूंची पेनल्टीचे यशस्वीरीत्या गोलमध्ये रूपांतर केले. युनायटेडच्या ड गेयाची पेनल्टी विलारेयालच्या गोलरक्षकाने अडवली. त्यामुळे विलारेयालने पेनल्टी शूट-आऊटमध्ये ११-१० अशी बाजी मारली. विलारेयालची एखादी युरोपियन स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -