घरक्रीडाIPL 2020: आदित्य ठाकरे आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या संघात!

IPL 2020: आदित्य ठाकरे आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या संघात!

Subscribe

आता क्रिकेटप्रेमींना आयपीएलचे वेध लागले आहेत. आयपीएलमधील विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (आरसीबी) संघात आदित्य ठाकरेची निवड करण्यात आली आहे. आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाने ही माहिती दिली.

यंदा आयपीएल हे युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयपीएलसाठी किती खेळाडू युएईमध्ये न्यायचे यावर बीसीसीआयने बंधन घातलेले आहे. पण युएईमध्ये जर फलंदाजांना सराव करायचा असेल तर त्यांना जास्त आणि विविधता असलेले गोलंदाज लागतील. त्यासाठीच विदर्भाचा वेगवान गोलंदाज असलेल्या आदित्य ठाकरेची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

आदित्य दमदार गोलंदाज

गेल्या काही वर्षांपासून आदित्य हा सातत्याने दमदार गोलंदाजी करत आहे. त्यामुळे त्याची निवड आरसीबीच्या या चमूमध्ये करण्यात आली आहे, असे म्हटले जात आहे. २०१८ साली झालेल्या युवा विश्वचषकातही आदित्यने चांगली कामगिरी केली होती. या विश्वचषकानंतर आदित्य प्रकाशझोतात आला होता. आदित्यने भारतातील स्थानिक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याची निवड यावर्षी आरसीबीच्या चमूमध्ये करण्यात आली आहे.

- Advertisement -

आदित्यला फक्त फलंदाजांना सराव देण्यासाठी आरसीबी संघाबरोबर युएईला नेणार आहेत. पण नेट्समध्ये सराव करत असताना जर त्याची गोलंदाजी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षकांना आवडली तर त्याला संघातून आयपीएल खेळण्याचीही संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता आदित्य सरावावर त्याचं आयपीएलमधील पदार्पण अवलंबून असेल, असे म्हटले जात आहे.


हे ही वाचा – महेंद्रसिंग धोनी केवळ यंदाच नाही, तर पुढील दोन आयपीएल खेळेल!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -