घरक्रीडाविदर्भाच्या अथर्वचे अप्रतिम शतक

विदर्भाच्या अथर्वचे अप्रतिम शतक

Subscribe

भारतविरूद्ध श्रीलंका १९ वर्षांखालील संघांत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात विदर्भाच्या अथर्व तायडेच्या जबरदस्त शतकासह भारताची श्रीलंकेवर २२९ धावांची आघाडी

श्रीलंका आणि भारत यांच्या १९ वर्षाखालील संघांतील कसोटी सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे सुरू आहे. सामन्यात श्रीलंकेचा पहिला डाव २४४ रनांत आटोपला असून भारताने आपल्या पहिल्या डावात ४७३ धावा करत श्रीलंकेवर २२९ धावांची आघाडी मिळवली आहे. भारताकडून विदर्भाच्या अथर्वने तुफान शतक झळकावत १६१ बॉलमध्ये १३ फोरसह ११३ धावा केल्या आहेत. अथर्वच्या या शतकामुळे सामन्यात भारताने इंग्लंडवर २२९ धावांची आघाडी घेतली आहे. अथर्व पाठोपाठच भारताच्या आयुष बदोनी यानेही अप्रतिम शतक झळकावले असून त्याने ११५ बॉलमध्ये १०७ रन केले आहेत.

सामन्याची सुरूवात श्रीलंकेने टॉस जिंकत बॅटिंगने केली. ज्यात भारताकडून अप्रतिम गोलंदाजी केली गेली आणि श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या २४४ रनांवर आटोपला. त्यानंतर भारताकडून बॅटिंगला सलामीवीर अथर्व तायडे आणि कर्णधार अनुज रावत यांनी मैदानावर प्रवेश केला. भारताच्या या सलामी जोडीने ९२ धावांची भागिदारी करत भारताला चांगली सुरूवात करून दिली. भारताकडून विदर्भाच्या अथर्वने अप्रतिम शतक झळकावत १६१ बॉलमध्ये १३ फोरसह ११३ रन केले. यानंतर भारताच्या नेहाल आणि आयुष यांनी अनुक्रमे नाबाद ८१ आणि नाबाद १०७ धावांची पारी खेळत भारताला २२९ अशी दमदार आघाडी मिळवून दिली आहे. विशेष म्हणजे आयुष याने याच सामन्यात ४ विकेटही घेतल्या आहेत.

- Advertisement -

अर्जुनेही केला याच सामन्यात आपला शुभारंभ

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन यानेही याच सामन्यातून आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. अर्जुनने आपल्या सलामीच्या सामन्यात पहिल्या १२ बॉलमध्येच विकेट घेत आंतरराष्ट्रीय सामन्यात आपले विकेटचे खाते खोलले आहे. त्याने श्रीलंकेचा सलामीवीर कामिल मिश्राला एलबीडब्लु आउट केले. कमिलने ११ बॉलमध्ये दोन फोर लावत ९ रन केले होते. अर्जुनच्या कामगिरीनंतर आता अथर्वने झळकावलेल्या शतकानंतर भारत सामन्यात चांगल्या स्थानावर दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -