घरक्रीडापद्म पुरस्कारासाठी डावलल्यामुळे विनेश फोगट नाराज

पद्म पुरस्कारासाठी डावलल्यामुळे विनेश फोगट नाराज

Subscribe

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटचे पती आणि पैलवान सोमवीर यांने पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. चांगली कामगिरी करूनही सलग दुसऱ्या वर्षी डावलण्यात आल्याने नक्की मेडल मिळवण्यासाठी तयारी करायची की पुरस्कारासाठी सेटिंग्ज करायची? असा सवाल सोमवीर यांने उपस्थित केला आहे. यंदा आठ खेळाडूंना पद्म पुरस्कार जाहीर झाला असून त्यामध्ये विनेश हिचं नाव नसल्याने सोमवीरने खदखद व्यक्त केली आहे. पती नंतर विनेश देखील नाराजी व्यक्त केली आहे.

सलग दुसऱ्या वर्षी डावलल्यामुळे अन्याय झाला असल्याचं विनेश हिने म्हटलं आहे. विनेश हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये असं लिहिलं की, ‘दरवर्षी आपले सरकार अनेक खेळाडूंना पुरस्कार देते. हे पुरस्कार क्रिडा आणि खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यास प्रोत्साहित करतात. मात्र असं दिसून आलं आहे की कित्येक वेळा या पुरस्कारांनी सध्या अलीकडे केलेल्या कामागिरी आणि यशांचा सन्मान केला जात नाही. योग्य खेळाडूला सोडलं जातं आहे असं दिसतं आहे. २०२०च्या पुरस्कारांमध्ये देखील असंच काहीस घडलं आहे. हा पुरस्कार कोणाला मिळणार याचा निर्णय कोण घेतं? निर्णायक मंडळामध्ये सध्याचे आणि माजी खेळाडूंचा समावेश असतो का? हे कार्य कसं केलं जातं? शेवटी हे अन्यायकारक झालं आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकून विनेशने टोकियो ऑप्लिम्पिक २०२० चा कोटा जिंकला होता. ऑप्लिम्पिकसाठी कोटा मिळविणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू होती. याशिवाय २०१९ मध्ये आशियाई कुस्ती स्पर्धेतही विनेशने कांस्यपदक जिंकले होते.

- Advertisement -

हेही वाचा – ‘भारत हा एका पक्षाचा नसून १२५ कोटी नागरिकांचा आहे’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -