‘भारत हा एका पक्षाचा नसून १२५ कोटी नागरिकांचा आहे’

देशावर परिणाम करणाऱ्या नकारात्मक प्रभावाविरूद्ध लढण्यासाठी प्रत्येक नागरिकांने महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे गरजेचे आहे, असं रामदेव बाबा म्हणाले.

Country belongs to 125 crore Indians, not to one political party: Ramdev
'भारत हा एका पक्षाचा नसून १२५ कोटी नागरिकांचा आहे'

योगगुरू रामदेव बाबा नेहमीचं आपल्या विधानामुळे चर्चेत असतात. रविवारी रामदेव बाबा म्हणाले की, भारत देश एका राजकीय पक्षाचा किंवा विचारसरणीचा नसून तो १२५ कोटी नागरिकांचा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या प्रयत्नातून आपण या देशाला महासत्ता करू शकतो. पुढे रामदेव बाबा म्हणाले, देशावर परिणाम करणाऱ्या नकारात्मक प्रभावाविरूद्ध लढण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकांने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे. तसंच याशिवाय देशात होणारी आंदोलन ही देशाविरोधील लोकांचा राष्ट्राच्या सामंजस्यात अडथळा आणण्याच्या हेतू असल्याचं रामदेव बाबांनी सीएएवरील निषेधाबद्दल बोलताना म्हणाले.

भारत कधीही आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या स्थिर व्हावा अशी इच्छा देशाबाहेरील फूट पाडणारी शक्ती बाळगणार नाही. देशाबाहेरील या शक्तीमुळे आपली अर्थव्यवस्था देखील प्रभावित होत आहे. तसंच जबाबदार नागरिकांनी देशाकरिता समृद्ध आर्थिक मार्गासाठी सकारात्मक वातावरण निर्माण केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला नवीन भारताचे स्वप्न साध्य करण्यासाठी त्यांना प्रत्येक दिशेने हातभार लावणे आवश्यक आहे, असं रामदेव बाबा म्हणाले.


हेही वाचा – सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटचं हेलिकॉप्टर अपघातात निधन