Virat Kohli Century: विराट कोहलीचा शतकांचा असाही विक्रम, रहाणेही एक पाऊल मागे

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं. केपटाऊनमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. कोहलीने कसोटी सामन्यांमध्ये १०० कॅचेस घेण्याचा विक्रम केला आहे. तर अंजिक्य रहाणे कॅच घेण्यामागे त्याच्या एक पाऊल मागे आहे.

कोहलीने कसोटी सामन्यामध्ये १०० कॅचेस जिंकत नवीन विक्रम केला आहे. टेम्बा बवूमा या आफ्रिकन खेळाडूची कॅच पकडत त्याने १०० कॅचेस पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे कॅचेस घेण्यामागे कोहली ७ वा भारतीय खेळाडू ठरला आहे. तर त्याच्यापाठोपाठ अजिंक्य रहाणे त्याच्या एक पाऊल मागे आहे. आतापर्यंत रहाणेने ९९ कॅचेस जिंकल्या आहेत.

कसोटीमध्ये सर्वात जास्त कॅच झेलणारे खेळाडू

राहुल द्रविड – २०९
लक्ष्मण   – १३५
सचिन    – ११५
गावस्कर   – १०८
अजहरुद्दीन  – १०५

दरम्यान, पहिल्या दिवसातील कसोटीमध्ये पहिल्या डावात विराट कोहलीने ७९ धावा काढत अर्धशतक झळकावलं. परंतु दुसऱ्या डावात त्याने आपल्या शैलीच्या जोरावर कॅचेसमध्ये एक अनोखा विक्रम केला आहे.


हेही वाचा : Mumbai Corona Update: कोरोनाचा कहर! मुंबईत कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ