घरक्रीडाIND vs SA: केपटाऊनमध्ये खेळण्यास विराट कोहली सज्ज, कर्णधाराचं मोठ्या रेकॉर्डवर लक्ष

IND vs SA: केपटाऊनमध्ये खेळण्यास विराट कोहली सज्ज, कर्णधाराचं मोठ्या रेकॉर्डवर लक्ष

Subscribe

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामने खेळण्यात आले आहेत. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर दणदणीत विजय मिळवत १-१ अशी बरोबरी साधली. परंतु आता तिसऱ्या कसोटी सामन्याला ११ जानेवारी म्हणजे उद्यापासून सुरूवात होणार आहे. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा सामना खेळण्यास सज्ज झाला आहे. तसेच त्याचं लक्ष आता मोठ्या रेकॉर्डवर राहणार आहे. यावेळी इतिहास घडवण्याची संधी कोहलीकडे आहे.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना केपटाऊनमध्ये होणार आहे. केपटाऊनमधील विराट कोहलीचा हा ९९ वा सामना ठरणार आहे. त्यामुळे तो काय कमाल करणार?, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. कोहलीने आतापर्यंत ७ हजार ८५४ धावा कसोटी सामन्यात केल्या आहेत. तर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत विराट ३२ व्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही विराट कोहली फिट असल्याचे संकेत दिले आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरूवात होणार आहे. तर दुपारी १.३० वाजता नाणेफेक उडवण्यात येईल.

मास्टर ब्लास्टरच्या क्लबमध्ये सहभागी होण्याची शक्यता

जर कोहलीने केपटाऊन कसोटीच्या दोन्ही डावांl १४६ धावसंख्येपेक्षा अधिक धावा काढल्या तर तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ८ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा ३१ वा फलंदाज क्रिकेटपटू ठरेल. क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये कोहलीची सरासरी ५०.३४ इतकी आहे. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर २७ शतकं आणि अर्धशतकं आहेत. त्यामुळे कोहली सर्वाधिक धावांमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये सहभागी होऊ शकतो.

- Advertisement -

असे असतील दोन्ही उभय संघ :

टीम इंडिया संघ –

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे, जयंत यादव, प्रियांक पांचाळ, उमेश यादव, हनुमा विहारी, इशांत शर्मा.

दक्षिण आफ्रिका संघ –

डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), रेयान रिकलटन (विकेटकीपर), रासी व्हॅन डर डूसेन, काइल वेरेने, मार्को जेन्सन, ग्लेनटन स्टुरमॅन,वियान मुल्डर, कीगन पीटरसन, प्रेनेलन सुब्रायन, सिसांडा मगला, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडेन मार्कराम, डुआने ओलिवर, जॉर्ज लिंडे, सरेल एरवी, बेउरन हेंड्रिक्स, कागिसो रबाडा.


हेही वाचा : …अखेर ‘त्या’ प्रकरणात टेनिस स्टार नोवाक जोकोविचचा कायदेशीर विजय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -