घरताज्या घडामोडीऐन थंडीत Urfi Javedच्या हॉटनेसने नेटकरी घायाळ

ऐन थंडीत Urfi Javedच्या हॉटनेसने नेटकरी घायाळ

Subscribe

बोल्ड आउटफिटसोबत ग्लॉसी न्यूड मेकअप केला आहे. लायनर आणि इंटेंस मस्करासोबत तीने तिचे सुंदर डोळे डिफाइन केले आहे. त्याचप्रमाणे उर्फीने या लुकला फायनल टच देण्यासाठी ओपन कर्ली हेअर लूक दिला आहे.

टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed)  तिच्या आगळ्या वेगळ्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फीने सध्या तिच्या नव्या हॉट लूकने नेटकऱ्यांना घायाळ केले आहे. उर्फीने नुकतेच एक फोटोशूट केले ज्यातील उर्फीच्या लूकचे सर्वांनीच कौतुक केले आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. थंडी देखील वाढली आहे. उर्फीने मास्क किंवा स्वेटर नाही तर थेट Black Lingerie वर फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत. उर्फीला थंडी वाजत नाही का अशा अनेक कमेंट फोटोंवर पहायला मिळत आहेत.

उर्फीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने ब्लॅक ब्रालेट आणि मिनी स्कर्ट घातला आहे. ज्यात उर्फीच्या टॅटूने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उर्फीने ब्लॅक ब्रालेटला लूक देण्यासाठी हेवी नेकलेस देखील घातला आहे. वेस्टर्न आउटफिटवर एथनिक ज्वेलरी घालून उर्फीने तिच्या लूकला फ्यूजन टच दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

- Advertisement -

 

- Advertisement -

उर्फीच्या मेकअपविषयी बोलायचे तर तिने बोल्ड आउटफिटसोबत ग्लॉसी न्यूड मेकअप केला आहे. लायनर आणि इंटेंस मस्करासोबत तीने तिचे सुंदर डोळे डिफाइन केले आहे. त्याचप्रमाणे उर्फीने या लुकला फायनल टच देण्यासाठी ओपन कर्ली हेअर लूक दिला आहे.

उर्फीने नेहमीच तिच्या हॉट अँड बोल्ड अंदाजाने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहे. तर अनेकवेळा उर्फी ट्रोलर्सच्या निशाण्यावर देखील आली आहे. उर्फीच्या ड्रेसिंग स्टाइलवर अनेकांनी आक्षेप देखील घेतला आहे. उर्फीने बिग बॉस ओटीटीमध्ये सहभाग घेतला होता. मात्र पहिल्या राउंडमध्येच उर्फी घराबाहेर पडली. मात्र त्यानंतर तिच्या अतरंगी लुक्समुळे ती सतत लाइम लाइटमध्ये राहिली.

उर्फी बिग बॉसमध्ये फार कमी वेळ होती मात्र तिच्या डॉशिंग स्वभावामुळे आणि बोल्ड अंदाजामुळे उर्फीने सोशल मीडियावर तिची चांगलीच फॅन फॉलोविंग तयार केली. मध्यतंरी उर्फी ब्लू बिकीनीमध्ये दिसली होती. त्यावरुन देखील ती प्रचंड चर्चेता विषय बनली होती.


हेही वाचा –  Urfi Javedने गाठला इन्स्टाग्रामवर २ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा, बोल्ड अंदाजात मानले फॅन्सचे आभार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -