घरक्रीडाविराट कोहलीच्या जल्लोषामुळे पंचिंग बॅग असल्यासारखे वाटले!

विराट कोहलीच्या जल्लोषामुळे पंचिंग बॅग असल्यासारखे वाटले!

Subscribe

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने मागील वर्षी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकत बॉर्डर-गावस्कर करंडक आपल्या नावे केला. आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जाणारा कोहली संपूर्ण कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर जोरदार जल्लोष करताना पाहायला मिळाला. मात्र, बॉल टॅम्परिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी कोहलीशी हुज्जत घालणे टाळले. त्यावेळी मला पंचिंग बॅग असल्यासारखे वाटते होते, असे विधान ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी केले.

तो दिवस मला अजूनही आठवतो. मला त्यावेळी पंचिंग बॅग असल्यासारखे वाटले होते. आम्ही विराटला प्रत्युत्तर देऊ शकत नव्हतो, कारण आमचे हात जणू कोणीतरी बांधून ठेवले होते. आम्हाला गप्प बसून विराटला जल्लोष करताना पाहावे लागले. इतरांसाठी वेगळे नियम आहेत आणि आमच्यासाठी वेगळे आहेत असे मला बरेचदा वाटते. त्यांचा कर्णधार हवा तसा वागू शकतो, पण आम्हाला काळजीपूर्वक वागावे लागते, असे लँगर अ‍ॅमेझॉनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द टेस्ट या डॉक्युमेंट्रीमध्ये म्हणाले.

- Advertisement -

तुम्ही वाटल्यास विराटशी हुज्जत घाला, पण शिवीगाळ करु नका, असेही लँगर यांनी आपल्या खेळाडूंना सांगितले होते. एखाद्याशी हुज्जत घालणे आणि शिवीगाळ करणे यात खूप फरक आहे. तुम्ही त्याला शिवीगाळ करु शकत नाही, पण तो तुमची थट्टा करत असले तर त्याच्याशी हुज्जत घातली पाहिजे, असे लँगर यांनी नमूद केले.

…म्हणून त्याच्याशी हुज्जत घातली- पेन

- Advertisement -

पर्थ येथे झालेल्या दुसर्‍या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याबाबत पेनने सांगितले, विराट जोरात जल्लोष करत होता आणि मला हे आवडले नाही. मी कर्णधार आहे आणि आम्ही गप्प बसणार नाही हे त्याला दाखवून देणे गरजेचे होते, असे मला त्यावेळी वाटले. त्यामुळे मी विराटशी हुज्जत घातली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -