घरक्रीडाऑस्ट्रेलियासाठी सज्ज - रोहित शर्मा

ऑस्ट्रेलियासाठी सज्ज – रोहित शर्मा

Subscribe

वेस्ट इंडीजवरील विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे असे रोहित म्हणाला.

भारताने वेस्ट इंडिजवर तिसऱ्या टी-२० सामन्यात ६ विकेट राखून विजय मिळवला. त्यामुळे भारताने ही मालिका ३-० अशी जिंकली. त्याचप्रमाणे भारताने विंडीजचा २-० असा कसोटी मालिकेत तर ३-१ असा एकदिवसीय मालिकेत पराभव केला होता. या विजयांमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे आणि संघ आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तयार आहे असा विश्वास रोहित शर्माने व्यक्त केला आहे.

कामगिरीत सातत्य राखण्याची आवश्यकता

रोहित आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत म्हणाला, “ऑस्ट्रेलिया दौरा हा नेहमीच आव्हानात्मक असतो. तिथल्या खेळपट्या, हवामान हे वेगळे असते. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना खेळाडू आणि संघ या दोघांचाही कस लागतो. ऑस्ट्रेलियात जिंकण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम खेळच करावा लागतो. पण आम्ही विंडीजविरुद्ध ज्याप्रकारे प्रदर्शन केले त्यामुळे आमच्यात खूप आत्मविश्वास आलेला आहे. आम्ही हाच आत्मविश्वास ऑस्ट्रेलियातही कायम ठेवला तर आम्ही तिथे जिंकू शकतो. मात्र आम्ही मागील कामगिरीचा फार विचार करता कामा नये. आम्हाला ऑस्ट्रेलियात जाऊन पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलिया हे कठीण आव्हान असले तरी आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत. आम्हाला फक्त कामगिरीत सातत्य राखण्याची आवश्यकता आहे.”

कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करायला आवडेल

रोहित हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असला त्याला कसोटी क्रिकेटमध्ये फारसे यश लाभलेले नाही. त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याचा तो फार विचार करत नाही आहे, “मला फार दूरचा विचार करायला आवडत नाही. माझे लक्ष्य आधी टी-२० मालिकेत चांगले प्रदर्शन करण्याचे आहे. मला कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करायला नक्कीच आवडेल. पण मी त्याचा फार विचार करत नाही आहे.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -