घरक्रीडाPAK vs WI : पाकिस्तानविरूध्दच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत नसणार कर्णधार कायरन पोलार्ड;...

PAK vs WI : पाकिस्तानविरूध्दच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत नसणार कर्णधार कायरन पोलार्ड; काय कारण?

Subscribe

वेस्टइंडीजच्या संघाचा मर्यादित षटकांचा कर्णधार कायरन पोलार्ड पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही

वेस्टइंडीजला पाकिस्तान दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच मोठा झटका बसला आहे. वेस्टइंडीजच्या संघाचा मर्यादित षटकांचा कर्णधार कायरन पोलार्ड पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. त्याने दुखापतीच्या कारणास्तव पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नसल्याचे सांगितले आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात देखील पोलार्ड दुखापतीने ग्रस्त होता. दरम्यान त्या दुखापतीतून तो अद्याप सावरला नाही. वेस्टइंडीजच्या पाकिस्तान दौऱ्याला १३ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या दरम्यान दोन्ही संघामधील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना कराचीमध्ये खेळवला जाणार आहे. पोलार्डने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर क्रिकेट वेस्ट इंडीजने त्याच्या जागी एकदिवसीय संघात डेव्हन थॉमसचा समावेश केला आहे.

तर टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी रोवमॅन पावेलला संधी मिळाली आहे. यावेळी दुखापतग्रस्त पोलार्ड त्रिनिदादमध्ये राहणार असून क्रिकेट विंडीजचे मुख्य वैद्यकीय अधिकारी इस्रायल दौलत त्याची देखभाल करणार आहेत. इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी पोलार्डची चाचणी होणार आहे.

- Advertisement -

कर्णधार कायरन पोलार्डच्या गैरहजेरीत निकोलस पूरनकडे टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे. तर शाई होप एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार असणार आहे. शाई होप प्रथमच एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे कर्णधारपद भूषवणार आहे.

वेस्टइंडीजचा एकदिवसीय संघ –

शाई होप (कर्णधार), निकोलस पूरन, डारेन ब्राव्हो, शमराह ब्रूक्स, रोस्टन चेज, जस्टिन ग्रीव्स, अकिल हुसैन, अल्जारी जोसेफ, गुडाकेश मोती, अँडरसन फिलीप, रेमन रेफर, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, डेव्हॉन थॉमस, हेडन वॉल्श जूनियर.

- Advertisement -

वेस्टइंडीजचा टी-२० संघ –

निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप, डारेन ब्राव्हो, रोस्टन चेज, शेल्डन कॉट्रेल, अकिल हुसैन, ब्रेंडन किंग, कायल मेयर्स, गुडाकेश मोती, रोवमॅन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशाने थॉमस, हेडन वाल्श ज्युनियर,


हे ही वाचा: http://Asian Champions Trophy : गुरजीत कौरचे पाच गोल; भारताने थायलंडचा १३-० ने केला पराभव


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -