घरक्रीडापाकिस्तानकडून अभिनंदन यांचा पुन्हा अपमान; वर्ल्डकप सामन्यासाठी आक्षेपार्ह जाहिरात

पाकिस्तानकडून अभिनंदन यांचा पुन्हा अपमान; वर्ल्डकप सामन्यासाठी आक्षेपार्ह जाहिरात

Subscribe

पाकिस्तानी चॅनलने पुन्हा एकदा भारताची कुरापत काढली असून वर्ल्डकपमधल्या भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यासाठी विंग कमांडर वर्थमान अभिनंदन यांना दर्शवणारं पात्र वापरून एक आक्षेपार्ह जाहिरात त्यांनी प्रसारित केली आहे.

भारत विरूद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा ज्वर क्रिकेट चाहत्यांवर काही औरच असतो. त्यातही हा सामना जर वर्ल्डकपमधला असेल, तर काही बोलायलाच नको. यंदाही १६ जून रोजी भारताचा वर्ल्डकपमधला चौथा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. या सामन्यासाठी सर्वच क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता असतानाच पाकिस्तानने पुन्हा एकदा आगळीक करून भारतीयांच्या भावना दुखावणारी कृती केली आहे. पाकिस्तानने या सामन्यासाठी एक जाहिरात तयार केली असून त्यामध्ये विंग कमांडर वर्थमान अभिनंदन यांचं एक पात्र घेतलेलं आहे. यामध्ये त्यांच्या पाकिस्तानी सैनिकांसमोर केलेल्या वक्तव्यांचा वापर करून भारताची टर उडवण्यात आली आहे. या जाहिरातीनंतर भारतीयांनी सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू केली आहे.

काय आहे या जाहिरातीमध्ये?

बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केल्यानंतर भारताच्या एका विमानाचे कमांडर वर्थमान अभिनंदन पाकिस्तानी लष्कराच्या तावडीत सापडले होते. पाकिस्तानी लष्कराने त्यांच्या केलेल्या चौकशीचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी विचारलेल्या प्रश्नांचीच सरमिसळ करून त्यातून भारत-पाकिस्तान सामन्यावर व्यंग करण्यात आलं आहे. शिवाय या व्हिडिओमध्ये वर्थमान अभिनंदनव यांच्यासारखंच दिसणारं पात्र घेऊन त्याला भेदरलेल्या अवस्थेत दाखवण्यात आलं आहे. मात्र, खऱ्या व्हिडिओमध्ये असं काहीही नव्हतं. ‘टॉस जिंकल्यावर काय करणार? शेवटचे ११ खेळाडू कोण असणार?’ असे प्रश्न या व्हिडिओमध्ये अभिनंदन यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला विचारण्यात येत आहेत. त्यावर ‘मी तुम्हाला हे सांगू शकत नाही’ असं उत्तर ती व्यक्ती देत आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर भारतीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

काय झालं होतं अभिनंदन यांच्यासोबत?

पुलवामा येथे अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातल्या बालाकोट येथील अतिरेकी तळावर २६ फेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईक केला. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती नंतर समोर आली होती. मात्र, भारतीय विमानं परत येताना त्यातलं एक विमान पाडण्यात पाकिस्तानी लष्कराला यश आलं आणि त्यातूनच विंग कमांडर वर्थमान अभिनंदन यांना पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतलं होतं. नंतर आंतरराष्ट्री दबाव आणि भारताचे प्रयत्न यांच्या जोरावर वर्थमान अभिनंदन यांना पाकिस्तानच्या तावडीतून सोडवण्यात भारताला यश आलं होतं.

- Advertisement -

सोशल मीडियावर संताप

या जाहिरातीनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होऊ लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -