घरक्रीडाVIDEO: WWE रेसलर सिल्वर किंगचा रिंगमध्येच मृत्यू

VIDEO: WWE रेसलर सिल्वर किंगचा रिंगमध्येच मृत्यू

Subscribe

'सिल्वर किंग'च्या नावाने प्रसिध्द असलेल्या मेक्सिकोच्या ५१ वर्षीय रेसलर सिझर बॅरन शनिवारी लुशा लिब्र रेसलिंग या कार्यक्रमात सहभागी झाला होता. मॅच सुरु असताना हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला.

WWE चा प्रसिध्द रेसलर सिल्वर किंग उर्फ सिझर बॅरन याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. रिंगमध्ये मॅच सुरु असताना सिल्वर किंगचा मृत्यू झाला आहे. शनिवारी लंडनच्या राऊंड हाऊसमध्ये सुरु असलेल्या मॅच दरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर WWEच्या जगामध्ये खळबळ उडाली. लोकांना यावर विश्वासत बसत नाही की सिल्वर किंगचा मृत्यू झाला आहे. रिंगमध्ये मॅच सुरु असताना प्रतिस्पर्धी रेसलरचा प्रत्युत्तर देणारा प्रसिध्द सिल्वर किंग अचानक कसा शांत झाला हेच लोकांना कळाले नाही. त्यांना वाटत होते की सिल्वर किंग हा बेशुध्द पडला. मात्र सिल्वरच्या आयुष्यातली ही मॅच शेवटची ठरली आहे. हार्ट अटॅक येऊन सिल्वर किंगचा मृत्यू झाले असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

‘सिल्वर किंग’च्या नावाने प्रसिध्द असलेल्या मेक्सिकोच्या ५१ वर्षीय रेसलर सिझर बॅरन शनिवारी लुशा लिब्र रेसलिंग या कार्यक्रमात सहभागी झाला होता. मॅच सुरु असताना सिल्वर किंग अचानक खाली कोसळला. रेफरीने अनेकदा बोलून देखील सिल्वर किंग उठला नाही त्यामुळे डॉक्टरांना बोलावले गेले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्यांनी त्याला मृत घोषित केले. मॅच सुरु असतानाच सिल्वर किंगला हार्ट अटॅक आला आणि त्यात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. सिल्वर किंगच्या मृत्यूमुळे WWEच्या जगामध्ये शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

दरम्यान, लंडन पोलिसांनी सिल्वर किंगचा मृत्यू संशयितरित्या झाला नसल्याचे म्हटले आहे. मात्र सिल्वर किंगचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. सिल्वर किंगच्या मृत्यूमुळे WWEच्या जगामध्ये शोककळा पसरली आहे. तर जगभरातील सिल्वर किंगच्या चाहत्यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -