घरटेक-वेकCoronaVirus: लवकरच तुमचा स्मार्टफोन होणार कोरोना ट्रॅकर!

CoronaVirus: लवकरच तुमचा स्मार्टफोन होणार कोरोना ट्रॅकर!

Subscribe

अॅपल आणि गूगल आता तुमचा स्मार्टफोनचे रुपांतर कोरोना ट्रॅकरमध्ये करणार आहेत.

कोरोना वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर अनेक कोविड १९चे अॅप्स आणि वेबसाईट तयार केल्या आहेत. यामध्ये काही सरकारी अॅप्स आणि तर काही खासगी अॅप्स आहेत. आता अमेरिकन टेक कंपनी देखील अॅपल आणि गूगल कोरोना ट्रॅकिंग सिस्टमवर काम करत आहेत. परंतु गूगल आणि अॅपल हे सिस्टिम आपल्या स्मार्टफोनला कोरोना ट्रॅकरमध्ये रुपांतरित करण्यासाठी तयारी करत आहेत.

जगभरात अॅपल आयओएस आणि अँड्रॉइड स्मार्टफोन सर्वाधिक आहेत. दरम्यानच अँड्रॉइड आणि आयओएस आधारित असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये कोरोना ट्रॅकर दिले जाऊ शकते. त्यामुळे गुगल आणि अॅपल स्मार्टफोन आधारित इंटिग्रेटेड कोरोना ट्रॅकरवर काम करत आहेत.

- Advertisement -

गूगल आणि अॅपल एकत्र येऊन कोरोना ट्रॅकर आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये टाकण्याची तयारी करत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला हे अपडेट करण्यासाठी जारी केले जाऊ शकते.

अॅपल आणि गूगलच्या मार्फत तयार केला जाणारा कोरोना ट्रॅकर जे रोलिंग प्रॉक्सिमिटीचे काम करेल. त्यामध्ये ब्लूटूथमधून ट्रान्सफर होणारी माहितीचा वापर केला जाणार आहे. जेव्हा स्मार्टफोन युझर कोरोना ट्रॅकिंग प्रोग्रामाचा वापर करेल तेव्हा त्याला कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाच्या जवळ गेल्यावर नोटिफिकेशनच्या मार्फत माहिती मिळेल.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात अॅपल आणि गूगल अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस रिलीज करेल. अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये थोडे वेगळे असतील. शासकीय आरोग्य संस्था अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसचे ट्रेसिंग अॅप्ससाठी वापर करू शकते. जेणेकरून लोकांना लगेच कळले की ते कोरोना रुग्णांच्या संपर्कात आले आहेत.

कोरोनाबाधित रुग्णाची ओळख यातून दिली जाणार आहे. जी माहिती दिली जाणार आहे. ती कोडेड स्वरुपात असणार आहे. जिथे कोरोनाचे अधिक रुग्ण सापडले आहेत अशा सर्व प्रकारची माहिती आरोग्य मंत्रालयाची व्यवस्था करणारे अपलोड करतील.

तसंच हे सिस्टिम कोरोना रुग्णांचा संपर्कात असलेल्या आणि जवळ्याच्या व्यक्तीचे १४ दिवसांच्या आत माहिती देईल. या आधारावर इतर लोकांना कोरोना होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाईल. त्यानंतर पुढे काय करायचे याबाबत सांगितले जाईल.

हे सॉफ्टवेअरसह फोन अपडेट झाल्यानंतर युझरला ऑप्ट इन ऑप्शन दिला जाईल. युझरने याची सहमती दिली तर फोन जवळपासच्या इतर स्मार्टफोनवर ब्लूटूथ सिग्नल पाठविणे सुरू करेल आणि इतर फोनचे ब्लूटूथ सिग्नल देखील रेकॉर्ड करण्यास सुरुवात करेल.


हेही वाचा – स्वस्त iPhone १५ एप्रिलला लाँच होणार; जाणून घ्या किंमत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -