घरटेक-वेकफ्लिपकार्टवरून मागवला ९९ हजारचा आयफोन ११ प्रो आणि...!

फ्लिपकार्टवरून मागवला ९९ हजारचा आयफोन ११ प्रो आणि…!

Subscribe

आजकाल ऑनलाइन शॉपिंग सोयिस्कर असल्यामुळे लोकांचा त्याच्याकडे जास्त कल वाढला आहे. घराबाहेर जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा ऑनलाइन शॉपिंग करण्याला लोक जास्त प्राधान्य देतात. मात्र हीच ऑनलाइन शॉपिंग काही लोकांना महागात पडते. ऑनलाइन शॉपिंग करताना सहजरित्या ग्राहकांना फसवलं जातं. बेंगलुरू येथील ग्राहकांने ऑनलाइन आयफोन ११ प्रोची ऑडर केली. मात्र त्याला ऑर्डरद्वारे बनावट आयफोन ११ प्रो मिळाला.

नक्की काय घडलं? 

इंटरनॅशनल बिझिनेस टाईम्सच्या वृत्तानुसार, बेंगलुरूमधील अभियंता रजनी कांत कुशवाह याने फ्लिपकार्टवरून ३४ जीबी व्हेरिएंट असलेल्या आयफोन ११ प्रोची ऑर्डर दिली. सवलतीच्या दरात असल्यामुळे त्याने ९३ हजार ९०० रुपये भरले. ही ऑर्डर लवकरात लवकर मिळेल अशी त्याची अपेक्षा असल्यामुळे त्याने लगेच पैसे भरले. मात्र एवढं सगळं करूनही त्याला आयफोन ११ प्रो मिळाचं नाही.

- Advertisement -

पहिल्यांदा रजनी ऑर्डर केलेल्या आयफोन पाहिल्यावर तो आयफोन ११ प्रो सारखा दिसतं होता. तुम्ही जर फोटोमध्ये पाहिलं तर तुम्ही सहजरित्या वाटेल हा आयफोन ११ प्रोचं आहे. रजनीला देण्यात आलेल्या आयफोनच्या मागील बाजूला असलेल्या ट्रिपल कॅमेराच्या बाजूला चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करून हायलाइट केला आहे. आयफोन ११ प्रो ट्रिपल कॅमेरा मॉड्यूल हा याच वर्षी लाँच करण्यात आला होता.

- Advertisement -

आयफोनमध्ये अँड्रॉइड अॅप्स!

रजनीला आयफोन ११ प्रोला ट्रिपल कॅमेराचा सेटअप स्टिकर असलेला बनावट आयफोन असला तरी फोनच्या मागच्या बाजूला कॅमेरा लावला होता. फक्त त्याला चुकीचा फोनच नसून त्याचं युनिट देखील आयओएसवर चालतं नव्हतं. या आयफोनमध्ये अँड्रॉइड अॅप्स आहेत, असं रजनी म्हणाला. हे बनावट उत्पादन मिळाल्यानंतर त्याने लगेचचं फ्लिपकार्टशी संपर्क साधला. त्याचा फोन लवकरच बदलण्यात येईल, असं आश्वासन कंपनीने त्याला दिले आहे.

आयफोन ८ ऐवजी मिळाली साबणाची वडी

गेल्या वर्षी अशाच प्रकारची घटना मुंबईतील व्यक्तीबाबत झाली होती. त्याने फ्लिपकार्ट आयफोन ८ ऑर्डर केला आणि त्याला आयफोन ८ ऐवजी साबणाची वडी मिळाली होती.


हेही वाचा – कपड्यांच्या खरेदीवर एक किलो कांदा फ्री; दुकानदाराची धम्माल शक्कल!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -