घरटेक-वेककूलपॅड कूल ३ प्लस लॉन्च

कूलपॅड कूल ३ प्लस लॉन्च

Subscribe

भारतीय तरुणांना स्मार्टफोनकडून केवळ मूलभूत गरजांपेक्षा काही तरी जास्त मिळण्याची अपेक्षा असते.आजची तरुण पिढी ही पैशाच्या मूल्यासोबतच आकर्षक डिझाइन आणि नाविन्यपूर्णता देखील शोधत असते. या मागण्या समजून घेऊन यूलॉन्ग द्वारा स्थापित कूलपॅड या आघाडीच्या जागतिक स्मार्टफोन ब्रँडने कूलपॅड कूल ३ प्लस लॉन्च केला आहे. हा फोन ड्यूड्रॉप डिस्प्ले, हेलिओ ए२२, ड्युअल सिक्योरिटीने सज्ज आहे.

एमटी ६७६१ (हेलिओ ए२२), क्वाड कोर २.० गिगाहर्टज क्लॉक स्पीड आणि ३ जीबी रॅम व आकर्षक ५.७ ड्यूड्रॉप स्क्रीन असलेला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च झाला असून त्यांच्या किंमत भलतीच किफायती आहे. आजच्या तरुण पिढीला नजरेसमोर ठेवून डिझाइन केलेला कूलपॅड कूल ३ प्लस ओशन ब्लू आणि चेरी ब्लॅक या दोन नवीन आणि बोल्ड रंगांमध्ये उपलब्ध असेल. कूल ३ प्लस मध्ये स्टोरेजच्या दृष्टीने २ जीबी रॅम / १६ जीबी स्टोरेज आणि ३ जीबी रॅम / ३२ जीबी स्टोरेज असे दोन प्रकार उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत अनुक्रमे ५,९९९/- रु आणि ६,४९९९/- रु आहे. या स्मार्टफोनचे बुकिंग २ जुलैपासून अमेझॉनडॉटइनवर करता येईल.

- Advertisement -

कूलपॅड इंडियाचे सीईओ फिशर यूआन म्हणाले, कूलपॅड कूल ३ प्लस लॉन्च करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हा फोन या देशात बजेट स्मार्टफोनची व्याख्याच बदलून टाकेल. आम्हाला खात्री आहे की हा स्मार्टफोन भारतीय लोकांना आवडेल आणि कूलपॅडला स्वतःचे सर्वात लाडका स्मार्टफोन ब्रँड बनण्याचे स्वप्न साकार करण्यास मदत होईल व या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत ३ दशलक्ष स्मार्टफोनचा टप्पा गाठू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -