घरटेक-वेकमर्सिडीजकडून गाडी खरेदीसाठी आर्थिक सुविधा

मर्सिडीजकडून गाडी खरेदीसाठी आर्थिक सुविधा

Subscribe

भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार निर्माती कंपनी मर्सिडीज-बेंझ हिने आज ’विशबॉक्स’ नावाची गाडी खरेदीसाठी ग्राहकांना आर्थिक सुविधा देणारी योजना सादर केली. या योजनेत काही अद्वितीय व नावीन्यपूर्ण असे आर्थिक प्रस्ताव देऊन ग्राहकांना त्यांच्या आवडीची, स्वप्नातील मर्सिडीझ बेंझ कार खरेदी करण्यास कंपनीने प्रोत्साहन दिले आहे. या खास योजनेमुळे ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास वाढेल व त्याद्वारे बाजारपेठेत अधिकाधिक व्यवहार होतील, अशी मर्सिडीझ बेंझ कंपनीला आशा आहे.

’की-टू-की चेंज’, ’25-25-25-25’, ’झीरो डाऊन पेमेंट’, ’स्टार अ‍ॅजिलिटी+’ आणि ’कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा’ इत्यादी पाच प्राथमिक वैशिष्ट्यांसह विशबॉक्स ही योजना नाविन्यपूर्ण आणिग्राहकानुरूप अशी मोबिलिटी सोल्यूशन्स कंपनी देऊ करते.
मर्सिडिज-बेंझ इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी मार्टिन श्वेंक याप्रसंगी म्हणाले, ’’मर्सिडीज बेंझमध्ये आम्ही भारतीय ग्राहकांची मानसिकता लक्षातघेतली आहे आणि त्यानुसारच त्यांना उत्कंठा वाटेल, अशा स्वरूपाची खास योजना आम्ही आणली आहे. वाहन उद्योगात प्रथमच सादर होणारी काही वैशिष्ट्ये या योजनेत आहेत.

- Advertisement -

कार खरेदी करताना ग्राहकांना सोयीच्या होतील अशा सवलती या निमित्ताने देऊन त्यांचा विश्वास पुन्हा जिंकण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. या नावीन्यपूर्ण आणि स्मार्ट अशायोजनेतून आम्ही सध्या बाजारपेठेत समोर येणार्‍या आव्हानांवर मात करीत आहोत आणि आमच्या ग्राहकांना कार खरेदीच्या त्यांच्या निर्णयांमध्ये मदत करीत आहोत. यायोजनेतील वैशिष्ट्यांचा ग्राहकांना निश्चितच चांगला उपयोग होईल आणि ही बाब बाजारपेठ विकसित होण्यास सहाय्यभूत ठरेल, असा आमचा विश्वास आहे.’’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -