घरटेक-वेकFlipkart वर स्मार्टफोन कार्निव्हल; Xiaomi, Realme वर मिळतेय जबरदस्त सूट

Flipkart वर स्मार्टफोन कार्निव्हल; Xiaomi, Realme वर मिळतेय जबरदस्त सूट

Subscribe

ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर Electronics Sale चे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल १६ मार्च पासून सुरू झाला आहे. तर हा सेल २० मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये लेटेस्ट टेक्नोलॉजीची बेस्ट प्राइज दिले आहेत. सध्या Flipkart वर स्मार्टफोन कार्निव्हल सुरु आहे. यामध्ये Xiaomi, Realme, Apple, Moto या स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट मिळत आहे. आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सद्वारे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ७५० रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. विक्रीदरम्यान अनेक बड्या कंपन्यांच्या स्मार्टफोनवर ग्राहकांना सूट मिळू शकते.

MI 10T आणि iPhone Pro Max सारख्या काही स्मार्टफोनवर ग्राहकांना एचडीएफसी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे 5000 रुपयांपर्यंतची त्वरित सूट देखील मिळत आहे. Poco M3 ला फ्लिपकार्टवर फक्त 10,999 रुपये किंमतीला विकला जात आहे. तथापि, ग्राहकांना आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून यावर 500 रुपयांची सूट मिळू शकते. हा 6000mAh बॅटरी आणि 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअपसह उपलब्ध आहे. MOTO G10 Power 9,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला. 500 रुपये सूट दिली जात असून सेलमध्ये 9,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

- Advertisement -

आयफोन 12 प्रो मॅक्सबद्दल बोलायचे झाले तर ते 1,22,900 रुपये किंमतीत विक्री केली जात आहे. फ्लिपकार्टवर एचडीएफसी बँक क्रेडिट व डेबिट कार्डवरही ग्राहकांना त्वरित ५००० रुपयांची सूट मिळू शकते.

Realme C12 8,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला. आता त्याचं 3 जीबी + 32 जीबी व्हिरिएंट 7,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन 6000 एमएएच बॅटरी आणि 13 एमपी ट्रिपल कॅमेरा सेटअपसह आला आहे. तसेच येथे सेल्फीसाठी 5 एमपी कॅमेरा उपलब्ध आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -