घरटेक-वेकGoogle ने भारतात लाँच केले Pixel Buds, पहा किंमत

Google ने भारतात लाँच केले Pixel Buds, पहा किंमत

Subscribe

हे इअरफोन्स २४ तास बॅकअप देतील असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Google ने Pixer 5a फोन लाँच केला. Pixel 5a भारतात लाँच करण्यात आला नाही. पिक्सेल हा स्मॉर्ट फोन भारतात लाँच करण्यात आला नसला तरी कंपनीने भरतीयांसाठी TWS इयरबड्स लाँच केले आहेत. भारतात हे इयरफोन्स नवीन नाहीत. अशाप्रकारचे इयरफोन्स कंपनीने गेल्या वर्षी देखील लाँच केले होते. मात्र आता हे इयरफोन्स भारतीयांसाठी देखील उपलब्ध करण्यात आले आहेत. भारतात या इअरफोन्सची विक्री कधी सुरू होईल हे मात्र अद्याप सांगण्यात आलेले नाही. (Google launches Pixel Buds in India, see price)

Google Pixel Buds TWS इअरबड्सची भारतात किंमत ९,९९९ रुपये इतकी आहे. Pixl Buds A च्या सीरिजमध्ये १२mmचे ड्राइवर्स लावण्यात आले आहेत. हे इअरफोन्स २४ तास बॅकअप देतील असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. Google Buds A IPX4 रेटेडमध्ये स्वेट आणि वॉटर रेजिस्टेट आहे. यात गूगल अस्टिस्टेंटचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गुगलवर वॉइज कमांड देऊन फंक्शन्स वापरण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे. तसेच या इयरबड्साठी गुगलकडून काही फिचर्स देखील देण्यात आले आहेत.

- Advertisement -

Google Pixel Buds TWS इअरबड्सचे महत्त्वाचे फिचर्स 

  • या इयरबड्सचे खास फिचर म्हणजे यात ४० भाषांचे रियल टाइम ट्रान्सलेशन करता येते त्यासाठी तुमच्याकडे एड्रॉइड स्मॉर्टफोन असणे गरजेचे आहे.
  • Android6च्या पुढील वर्जनसाठी हे इयबड्स वापरता येतील.
  • Googols Pixel Buds A सीरिजमध्ये एडप्टिव साउंड सपोर्ट देण्यात आलाय. कंपनीच्या म्हणण्यानुसार, युझर्स सराउंडिंग्स हिशोबाने स्वत: त्याचा साउंड एडजस्ट करू शकतात.
  • त्याचप्रमाणे कंपनीने पुढे असे देखील म्हणले आहे की, हे इयरबड्स १५ मिनिटे चार्ज केल्यास सलग तीन तास गाणी ऐकता येणार आहेत.
  • त इयरबड्स फुल चार्ज केल्यास २४ तास वापरता येऊ शकतात.
  • गुगल असिस्टेंटचा वापर करुन वॉइस कमांड देऊन कॉल रिसिव्ह करता येईल.

हेही वाचा – Ola Future Factory: ओलाच्या प्लांटमध्ये दर २ सेकंदाला बनते १ स्कूटर, ३ हजाराहून अधिक रोबोट करतायत काम

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -