घरटेक-वेकह्युमनाईड रोबोट जाणार अंतराळात???

ह्युमनाईड रोबोट जाणार अंतराळात???

Subscribe

सध्या नासाची मंगळ मोहिम सुरु आहे. सध्या मंगळावर मानव यान गेलेले नाही. अंतराळ बदलातील अधिक अभ्यासाठी पुढील काळात टोयोटाने बनवलेला हा रोबोट देखील जाऊ शकतो,

टोयोटा या कंपनीने अगदी अवतार या सिनेमाप्रमाणे ह्युमनाईड रोबोट तयार केला आहे. T-HR3 असे या मॉडेलचे नाव असून 5 G टेक्नॉलॉजीवर चालणारा हा रोबोट असून हा रोबोट घरगुती कामात माणसाची मदत करु शकणार आहे. घरगुती कामाशिवाय हॉस्पिटलमध्ये देखील हा रोबा मदत करु शकणार आहे. विशेष म्हणजे पुढील काळात हा रोबो अंतराळ संशोधासाठी अंतराळात देखील जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

वाचा- आता रोबोट बॉम्ब निकामी करणार

माणसांची करु शकणार नक्कल

5G कम्युनिकेशन असलेला हा रोबो माणसाची नक्कल ही करु शकतो. १० किलोमीटर अंतरावरुनही हा या रोबोला कंट्रोल करता येणार आहे. या रोबोमध्ये ‘मास्टर वेअरिंग सिस्टम’ आहे. जो रोबोटमधील सेंसरला माणसाप्रमाणे हालचाल करण्यासाठी मदतत करणार आहे. यासाठी एक मोठी खूर्ची तयार करण्यात आली असून त्याला रोबोसदृश्य हात आणि सेंसर्स लावण्यात आले आहेत. ज्यावर बसून आपण रोबो कंट्रोल करु शकतो. जर रोबोला कंट्रोल करणारी व्यक्ती पायावर उभी राहिली तर हा रोबो उभा देखील राहू शकतो, असे टोयोटाने सांगितले आहे.

- Advertisement -
पाहा- जेव्हा एक ‘रोबोट’ गाणं गाते; पाहा Video

अंतराळ संशोधनात करु शकतो मदत

सध्या नासाची मंगळ मोहिम सुरु आहे. सध्या मंगळावर मानव यान गेलेले नाही. अंतराळ बदलातील अधिक अभ्यासाठी किंवा एखाद्या अंतराळ मोहिमेसाठी पुढील काळात टोयोटाने बनवलेला हा रोबोट देखील जाऊ शकतो, असे टोयोटाकडून सांगण्यात आले आहे.त्यामुळे आता अंतराळात हा रोबो नेमका कसा पाठवला जाणार ते येत्या काळात टोयोटाकडून सांगण्यात येणार आहे. पण सध्या तरी या बद्दल काहीच अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -