तुम्हीही What’s Appमध्ये ‘या’ सेटिंग्स केल्या आहेत का? तर ठरु शकतात धोकादायक, आताच करा बदल

व्हॉट्स अँपमधील काही सेटिग्स आपल्याला वेळीच बदलण्याची गरज

WhatsApp calling Feature has stopped of users who do not accept What's App Privacy Policy
What's App Privacy Policy न स्विकारलेल्या युजर्सचे व्हॉट्स अँप कॉलिंग झाले बंद

व्हॉट्स अँप हे आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. कम्युनिकेशनसाठी सध्याच्या जगात व्हॉट्स अँपसारखा दुसरा कोणता सहज मार्ग नाही असे म्हणायला हरकत नाही. व्हॉट्स अँप आपल्याला अनेक नवीन फिचर्स, नव्या सेटिंग्स देत असतो. व्हॉट्स अँप वापरताना आपला संवाद, आपण शेअर करत असलेली वैयक्तिक माहिती सुरक्षित आहे का? आपले व्हॉट्स अँप हॅक होणार नाही असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आपण अनेक वर्षे व्हॉट्स अँप वापरत आहोत. मात्र आपण वापरत असेलल्या व्हॉट्स अँपमधील काही सेटिग्स आपल्याला वेळीच बदलण्याची गरज आहे. नाहीतर व्हॉट्स अँप हँक होण्याचे त्याचप्रमाणे आपली फसवणूक होण्याचा मोठा धोका आहे. काय आहेत त्या सेटिंग्स जाणून घ्या.

आपल्याला व्हॉट्स अँपवर येणारे कोणतेही फोटो, व्हिडिओ Automatic डाऊनलोड होत असतात किंवा सेव्ह होत असतात. कारण आपण व्हॉट्स अँपवरील ‘Default Saved Images’ हा ऑप्शन निवडलेला असतो. त्यामुळे येणारे व्हिडिओ, फोटो थेट आपल्या कॅमेरा रोल किंवा फोटो गॅलरीमध्ये सेव्ह होतात. मात्र या सेटिंगमुळे हॅकर्स फोन सहजपणे हँक करु शकतात, असे सायबर एक्सपर्टकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सेटिंग्समध्ये जाऊन Save to camera Roll हा पर्याय बंद करणे गरजेचे आहे.

व्हॉट्स अँपने काही दिवसांपूर्वी ‘Disappearing Messages’ हे नवीन फिचर युझर्ससाठी आणले आहे. या फिचरमुळे व्हॉट्स अँपवरील मेसेजेस अपोआप डिलीट होतात. मात्र ही सेटिंग आपल्या प्रायव्हसी बाबतीत धोकादायक ठरु शकते. कारण आपोआप डिलीट होणारे मेसेज ७ दिवसांपर्यंत राहतात. हे चॅट्स दुसरा युझर कॅप्चर करु शकतो. त्यामुळे प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते.

व्हॉट्स अँपमध्ये ‘iCloud Backup’ हे सेटिंग आहे. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, आपले चॅट iCloud गेल्यानंतर ते अँपल कंपनीची प्रॉपर्टी होते. चॅट्स iCloud मध्ये गेल्यावर सुरक्षा एजेन्सी तुमचे चॅट अँपलकडून घेऊ शकतात. त्यामुळे सायबर एक्सपर्टकडून icloud Backup न वापरण्याचा सल्ला दिला जातो.


हेही वाचा – Netflixवर पहा Behind the scene, नेटफ्लिक्सच्या युझर्ससाठी N-Plusचे खास सबस्क्रिप्शन