घरटेक-वेकOppo A72 5G पावरफूल प्रोसेसरसह लाँच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स

Oppo A72 5G पावरफूल प्रोसेसरसह लाँच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स

Subscribe

ओप्पो (Oppo)ने Oppo A72 नंतर आता याचा ५जी (5G) व्हेरिएंटही बाजारात आणला आहे. Oppo A72 5G युजर्सना पावरफूल प्रोसेसर आणि पंच होल डिझाईनसह खास फीचर्सच्या सुविधा मिळतील. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. परंतु 4G व्हेरिएंटमध्ये 5,000mAh बॅटरी दिली गेली होती. आता नवीन व्हेरिएंटमध्ये यापेक्षा कमी बॅटरीची क्षमता देण्यात आली आहे. सध्या कंपनीने Oppo A72 5G चीनी बाजारात लाँच केले आहे. पण लवकरच इतर देशांमध्येही लाँच करण्याची शक्यता आहे.

Oppo A72 5G किंमत?

Oppo A72 5G हा चीनमध्ये सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 8GB रॅमसह 128GB इंटरनल मेमरी आहे. या स्मार्टफोनची किंमत CNY 1,899 म्हणजे सुमारे २० हजार २०० रुपये आहे. युजर्स हा स्मार्टफोन निऑन, व्हायलेट आणि ब्लॅक कलरमध्ये खरेदी करू शकतील. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कंपनीने या स्मार्टफोनच्या उपलब्धताबाबत काही जाहीर केलेले नाही.

- Advertisement -

Oppo A72 5G फीचर्स

Oppo A72 5G मे ६.५ इंच फूल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. याचे स्क्रीन रेजोल्यूशन 1,080×2,400 पिक्सल आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. हा स्मार्टफोन Dimensity 720 चिपसेटवर काम करत आहे. या स्मार्टफोनमध्ये असलेल्या स्टोरेज युजर्स मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकतात. या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. याचे प्राइमरी सेंसर 16MP आहे. तर 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2MP चा तिसरा सेंसर दिला गेला आहे. तसेच यामध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. जो पंच होल डिस्प्लेसह आहे. पावरबॅकअपसाठी 4,040mAh ची बॅटरी दिली गेली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी Oppo A72 5G मध्ये वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएस देण्यात आले आहेत.


हेही वाचा – काय सांगताय? एकाच नंबरवरुन अनेक डिव्हाइसवर वापरता येणार WhatsApp

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -