घरदेश-विदेशसमुद्रात जहाजाला भीषण आग

समुद्रात जहाजाला भीषण आग

Subscribe

कोलकत्त्याला कंटेनर घेऊन जाणाऱ्या जहाजात स्फोट होऊन भीषण आग लागली. कृष्णपटनम येथून कोलकत्ताला हे जहाज जात असताना ही घटना घडली आहे. जहाजामध्ये असणाऱ्या २२ क्रु मेंबरला वाचवण्यात यश आलं आहे. या भीषण आगीमुळे जहाजाचे मोठं नुकसान झालं आहे.

- Advertisement -

जहाजातील कंटेनरमध्ये झाला स्फोट

कृष्णपटनम येथून कोलकत्ताला MVSSL जहाज ४६४ कंटेनर घेऊन जात होते. अचनाक या जहाजातील कंटेनरमध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये ६० कंटेनर जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच कोस्टगार्ड ताबडतोब मदतीसाठी डोर्नियर एअरक्राफ्टला पाठवले आहे. कोस्टगार्डच्या मदतीने जहाजामध्ये असणाऱ्या २२ क्रू मेंबरला वाचवण्यात यश आलं आहे. आग विझवण्यासाठी ४ जहाजांमार्फत बचावकार्य सुरु आहे. तर विशाखापट्टनम येथून एक जहाज आग विझवण्यासाठी पाठवण्यात आलं आहे.

जहाजाचा ७० टक्के भाग जळून खाक

या आगीमध्ये जहाजाचा ७० टक्के भाग जळून खाक झाला आहे. या जहाजामध्ये असलेले कंटेनर श्रेयस शिपिंग अॅण्ड लॉजिस्टिक्स कंपनीचे होते. बुधवारी रात्री सव्वा दहा वाजता जहाजामधील कंटेनरमध्ये अचानक स्फोट होऊन जहाजाला आग लागली. ही घटना हल्दीया बंदराच्या ६० नॉटिकल माइलजवळ झाली आहे. हल्दिया बंदर पश्चिम बंगाल राज्याचे सर्वात मोठं आणि प्रसिध्द व्यापारी बंदर आहे. या बंदरावर मोठमोठ्या जहाजांचे सतत येणं-जाणं असतं.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात घडली अशीच घटना!

मागच्या बुधवारी केरलजवळ एका जहाजाला भीषण आग लागली. या आगीमध्ये एका क्रु मेंबरचा मृत्यू झाला होता. क्रु मेंबर योगेश सोलंकींना जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. योगेश सोलंकी दीव-दमनचे रहाणारे होते.

तेल गळती झाल्यास कारवाई होणार!

कोस्ट गार्डचे महानिरिक्षक कुलदीप सिंह शेरोन यांनी सांगितलं की, या जहाजामधून तेल गळतीबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. जर अशाप्रकराची घटना समोर आली तर तटरक्षक दल कारवाई करेल. आम्ही जहाजातील सर्व क्रु मेंबरला वाचवले असून ते सुरक्षित आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -