घरटेक-वेकTata Tigor EV 2021 भारतात लाँच, सिंगल चार्जमध्ये ३०६ किमीची जबरदस्त रेंज

Tata Tigor EV 2021 भारतात लाँच, सिंगल चार्जमध्ये ३०६ किमीची जबरदस्त रेंज

Subscribe

टाटा मोटर्सच्या सर्व कार या सेफ्टीसाठी सर्वोत्तम मानल्या जातात.

टाटा मोटर्सने (Tata Motors) भारतातील त्यांची दुसरी इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV 2021 लाँच केली. Tigor EVही कार आधी केवळ सरकारी कार्यालयांसाठी मर्यादित होती. मात्र आता आलेले नवीन मॉडेल हे सर्वसामन्यांना देखील वापरता येईल. Tigor EV सेडानची किंमत XE व्हेरिएंटसाठी एक्स शोरुम किंमत ११.९९ लाख रुपये इतकी आहे. टाटा मोटर्सच्या सर्व कार या सेफ्टीसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. Tigor EV कारने ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ४ स्टॉर मिळवले आहेत. ही कार तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. XM व्हेरिएंटची किंमत १२.४९ लाख तर XZ+ व्हेरिएंट १२.९९ लाख असणार आहे. Tigor EV कार ही डेटोना ग्रे आणि टील ब्लू कलरमध्ये उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

Tata Tigor Ziptron टेक्नोलॉजीचा वापर करुन तयार करण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर असून ७४Ps आणि १७० Nmचा पीक टॉर्क जेनरेट करते. केवळ ५.९ सेकंदमध्ये ०-६० किमी प्रति घंट्याच्या वेगाने धावते असा दावा कंपनीने केला आहे.

Tata Tigor EV IP67 रेटेड बॅटरी पॅकसोबत येत आहे. कंपनीने यात ८ वर्षांची वॉरंटीसोबत १६०००० बॅटरी आणि मोटर वॉरंटी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इम्पेक रेसिस्टेंट बॅटरी पॅक केसिंग देखील देण्यात आला आहे. Tigor इलेक्ट्रिक बॅटरी चॉर्ज करण्यासाठी जवळपास १ तास लागतो. १ तासात ८० टक्के बॅटरी चार्ज केली जाऊ शकते. तर होम चार्ज करण्यासाठी जवळपास ८.५ तास लागतात.

- Advertisement -

हेही वाचा – फास्ट चार्जिंगमुळे मोबाईलचे नुकसान? बॅटरीचा होऊ शकतो स्फोट

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -