घरटेक-वेकInstagram Reels डाऊनलोड करण्यासाठी 'या' खास टिप्सचा करा वापर!

Instagram Reels डाऊनलोड करण्यासाठी ‘या’ खास टिप्सचा करा वापर!

Subscribe

इन्स्टाग्राम रील्स व्हिडीओ डाऊनलोड करायचा आहे. मग जाणून घ्या

देशात टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर इन्स्टाग्रामने वापरकर्त्यांसाठी Instagram Reels हे फिचर लॉन्च केले. हे फिचर लॉन्च केल्यानंतर काही काळातच खुप लोकप्रिय झाले आहे. अनेक इन्स्टाग्राम वापरकर्ते या रील्स फिचरचा वापर करत आहेत. या इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून १५ सेकंदाचा छोटा व्हिडीओ तयार करता येतो. टिकटॉक प्रमाणेच व्हिडिओ इन्स्टाग्राम रील्समध्ये तयार करता येतात. लाखो वापरकर्ते या इन्स्टाग्राम रील्सवर आपला व्हिडीओ तयार करुन अपलोड करत असतात. इन्स्टाग्राम रील्स पाहताना आपल्याला एखादा व्हिडीओ आवडल्यास तो डाऊनलोड करण्याची इच्छा होते. परंतु हा व्हिडिओ डाऊनलोड करणे इतके सोपं नाही. यासाठी तुम्हाला काही टीप्सचा वापर करावा लागतो. किंवा एखाद्या थर्ड पार्टी ॲपची मदत घ्यावी लागते. यासाठीच सोप्या पद्धतीने इन्स्टाग्राम रील डाऊनलोड करण्यासाठीच्या टीप्स तुम्हाला देत आहोत.

ॲन्ड्रॉईड युजर असल्यास या टीपचा करा वापर

इन्स्टाग्राम रील्स (Instagram Reels) डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गूगल प्ले स्टोमधून व्हिडीओ डाऊनलोड फोर इन्स्टाग्राम (Video Downloader For Instagram) हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. डाऊनलोड झाल्यावर ॲप ओपन करुन इन्स्टाग्राम आयवरुन लॉगइन करा. आपल्याला इन्स्टाग्राम रीलमधील जो व्हिडीओ डाऊनलोड करायचा आहे, तो सिलेक्ट करावा. आपल्या मोबाईल स्क्रिनवर तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करुन लिंक कॉपी करा. आता आपण डाऊनलोड केलेले व्हिडिओ डाऊनलोडर फॉर इन्स्ट्राग्राम हे ॲप ओपन करा आणि कॉपी केलेली लिंक पेस्ट करा. आपल्या फोनच्या गॅलरीमध्ये जाऊन पाहिल्यास डाऊनलोड केलेला रील्स व्हिडीओ दिसेल.

- Advertisement -

आयफोन युजर्सनी या टिप्सचा वापर करा

मोबाईलमधील ॲप स्टोरमध्ये जाऊन InSaver for Instagram ॲप डाऊनलोड करा. हे ॲप ओपन झाल्यास त्यामध्ये आपला आयडी टाका. इन्स्टाग्राम ॲप ओपन करुन आपल्याला डाऊनलोड करायचा रील व्हिडीओ सिलेक्ट करा. मोबाईल स्क्रिनवर असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा, तुमच्या आवडीच्या असलेल्या व्हिडिओची लिंक कॉपी करा. त्या व्हिडिओची लिंक InSaver for Instagram ॲप ओपन करा आणि त्यामध्ये व्हिडिओची युआरएल (URL) टाका. आपल्या फोनच्या गॅलरीमध्ये जाऊन पाहिल्यास डाऊनलोड केलेला रील्स व्हिडीओ दिसेल.

अशाप्रकारे तयार करा इन्स्टाग्राम रील

तुम्हालाही इन्स्टाग्रामवर रील करायची असल्यास सर्वात प्रथम तुम्हाला इन्स्टाग्राम ॲप ओपन करावे लागेल. इन्स्टाग्राम मध्ये Instagram Camera ओपन केल्यास खालच्या बाजूला रील हे फिचर सिलेक्ट करावे लागेल. हे रील फिचर सिलेक्ट केल्यास तुम्हाला स्क्रिनवर अनेक एडिटिंग टूल्स दिसतील. यामध्ये ऑडिओ, ए.आर इफेक्ट, टायमर, काऊंडाऊन आणि स्पीड असे फिचर्स दिसतील. तुम्हाला गरज असल्यास यातील कोणताही इफेक्ट वापरुन व्हिडीओ तयार करु शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -