घरटेक-वेकWhatsApp युजर्स सावधान; Pegasus Spyware चा तुमच्या प्रायव्हेट चॅटवर वॉच

WhatsApp युजर्स सावधान; Pegasus Spyware चा तुमच्या प्रायव्हेट चॅटवर वॉच

Subscribe

Pegasus Spyware पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. भारतातील ४० हून अधिक पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांच्या WhatsApp मधील प्रायव्हेट चॅटवर २०१९ मध्ये Pegasus Spyware मधून पाळत ठेवली जात होती. असे ‘द वायर’सह जगभरातील १५ मीडिया संस्थांनीही मान्य केले आहे. त्यामुळे युजर्सच्या WhatsApp मधील चॅटची हेरेगिरी करण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. तेव्हापासूनचं Pegasus Spyware वादाच्या भोवऱ्यात सापडले. पण आता पेगासस स्पायवेअर नेमका वापर कसा होतो आहे? असा प्रश्न युजर्सकडून विचारला जात आहे. जाणून घेऊ या…

‘पेगासस’ स्पायवेअर नेमक काय आहे?

पेगासस हे एक स्पायवेअर सॉफ्टवेअर आहे. जे इस्त्रायलच्या NSO ग्रुपने हे बनवलं आहे. या कंपनीने आजवर अनेक अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार केली आहेत. त्यामुळे या कंपनीला ‘सायबर वेपन्स’ बनवणारी कंपनी या नावावे ओळखले जाते. या कंपनीने तयार केलेले Pegasus Spyware या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व्यक्तीच्या मोबाईलमधील सर्व खासगी माहिती चोरली जाऊ शकते. आजवर अनेक देशातील सरकारने या सॉफ्टवेअरची खरेदी केली आहे. मात्र यातून गैरवापर होत असल्यास त्याची जबाबदारी कंपनी फेटाळली आहे.

- Advertisement -

‘असे’ होतेयं तुमचे WhatsApp हॅक 

Pegasus Spyware च्या माध्यमातून फोन हॅक झालायं हे युजर्सला समजत सुद्धा नाही. या कारणामुळे Pegasus Spyware चा वापर अनेक देशांमध्ये हेरगिरी करण्यासाठी होतोयं. हॅकर्सने टार्गेट केलेल्या फोनवर malicious वेबसाइटची एक लिंक पाठवली जाते. युजर्सने त्या लिंकवर क्लिक केल्यास त्यांचा फोनमध्ये आपोआपचं Pegasus Spyware इंस्टॉल होतोयं. WhatsApp Voice Call च्या माध्यमातूनही हे सॉफ्टवेअर अनेकदा इंस्टॉल केले जातेयं. हे अधिक अॅडव्हांस सॉफ्टवेअर असल्याने ते मिस कॉलच्या माध्यमातूनही फोनला टार्गेट करतोय.

एकदा हे सॉफ्टेवअर फोनमध्ये इंस्टॉल झाले, की ते आपले कार्य सुरु करते. अनेकदा मोबाईलमधील कॉल लॉग हिस्ट्री Pegasus Spyware च्या मदतीने डिलीट केली जाते. याची माहिती समजणे अवघड होते. त्यामुळे फोनमध्ये एकदा हे सॉफ्टवेअर इंस्टॉल झाले ते पूर्ण मोबाईल हॅक करतोयं. तसेच WhatsApp वरील प्रायव्हेट चॅटसंही वाचले जाताय़त. त्याशिवाय कॉल ट्रॅकिंग आणि मोबाईलमधील अॅक्टिव्हिट ट्रॅक केली जातेयं.

- Advertisement -

सायबर सिक्योरिटी रिसर्चरच्या मते, Pegasus Spyware युजर्सचा लोकेशन डेटा, फोनमधील व्हिडिओ कॅमेरासह मायक्रोफोनचा एक्सेस घेत आहे. यामुळे फोनमधील कोणाचेही संभाषण ऐकता येऊ शकते. तसेच मोबाईलमधील ब्राउझर हिस्ट्री, कॉन्टॅक्ट डिटेल्स, मेल आणि स्क्रीनशॉट देखील सहज चोरले जात आहेत.

Pegasus Spyware हे अल्टिमेट सर्विलांस टूल आहे. त्यामुळे कोणत्याही देशातील सरकारला एखाद्यावर लक्ष ठेवायचे असल्यास ते याचा वापर करतायंत. हे सॉफ्टवेअर एखाद्याच्या फोनवर चुकीच्या पद्धतीने पाळत ठेवण्यासाठी विकसित केलेले अधिक अॅडव्हांस सर्विलांस सॉफ्टवेअर आहे. जर ६० दिवसांच्या आत हे सॉफ्टवेअर कमांड अँड कंट्रोल सर्व्हरशी कनेक्ट न झाल्यास किंवा हे चुकीच्या डिव्हाईसमध्ये इंस्टॉल झाल्यास ते आपोआपचं स्वत:ला अनइंस्टॉल करते.

त्यामुळे Pegasus Spyware जगातील सर्वात महाग सॉफ्टवेअर आहे. याची किंमत लाखो डॉलर आहे. कंपनी अनेक देशांच्या सरकारलाच फक्त हे सॉफ्टवेअर विकते असे सांगते. त्यामुळे Pegasus Spyware चा वापर मोठ्याप्रमाणात केला जाऊ शकत नाही. त्यामुळे सामान्य युजर्सला या सॉफ्टवेअरमुळे घाबरण्याची काहीच गरज नाही.

काय आहे प्रकरण?

भारतासह जगातील अनेक देशांमधील हजारो पत्रकार आणि सोशल अँक्टिव्हिस्टच्या व्हॉटसअॅपवर पाळत ठेवण्यासाठी इस्रायली पेगासस नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर केल्याची माहिती २०१९ मध्ये उघड झाली. यानंतर व्हॉट्सअॅप कंपनीने  एनएसओ (NSO) या कंपनीविरोधात कोर्टात खटला दाखल केला. त्यामुळे संपूर्ण जगाचे या सॉफ्टवेअरने लक्ष वेधले. इस्रायलच्या NSO या इस्त्रायली सायबर इंटेलिजन्स कंपनीनं पेगासस सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप प्रायव्हेट पॉ़लिसीचा भंग करत पत्रकार, वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याचं व्हॉट्सअपनं जाहीर केलं. NSO या कंपनीनं मात्र त्यांच्यावरील हे आरोप फेटाळून लावले. सध्या याप्रकरणी खटला सुरु आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -