घरठाणेनवी मुंबईतील १४ गावांची पाणी टंचाई लवकरच होणार दूर !

नवी मुंबईतील १४ गावांची पाणी टंचाई लवकरच होणार दूर !

Subscribe

मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना आले यश

नवी मुंबई महापालिकेतून लागलेल्या १४ गावांमध्ये नागरिकांना गेल्या कित्तेक वर्षांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. पाणी समस्येमुळे नागरिक चांगलेच संतापले होते. या साठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी स्वतः या कामाची पाहणी करत पाठपुरावा सुरु केला होता. अखेर हे काम लवकरच पूर्णत्वास येत असून १४ गावातील पाणी समस्या आता सुटली जाणार आहे.

मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद (राजू )रतन पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी अनेक वेळा एकत्रित बैठंक याविषयी काय उपाय करता येईल यावर चर्चा केली होती व लोकांना लवकरात लवकर पाणी कसे मिळेल यावर भर दिला होता. आज प्रत्यक्ष कामांची पाहणी करत हे काम आता जवळजवळ पूर्णत्वास आल्याचे दिसले. आमदार राजू पाटील यांनी स्वतः नागाव ,दहिसर, भंडारली आदी गावांमधील पाणी पुरवठा योजनेची माहिती घेत गावकऱ्यांसोबत चर्चा केली आहे. त्यामुळे देश स्वातंत्र्याच्या कालखंडानंतर पहिल्यांदा नळाचं पाणी गावात येणार असल्याने गावकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.

- Advertisement -

नावाळी रुग्णालयाची मनसे आमदारांनी केली पाहणी

नवी मुंबई महापालिकेत समाविष्ठ असताना १४ गावांसाठी आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले होते. मात्र नवी मुंबई महापालिकेतून ही गावं वगळल्याने रुग्णालयाची जोपासना झाली नाही. त्यामुळे आता हि वास्तू धूळखात पडली असल्याने तिच्या नव्याने निर्मितीसाठी आणि तांत्रिक बाबी दूर करण्यासाठी ग्रामस्थांसह मनसे आमदार राजू पाटील यांनी रुग्णालयाची पाहणी केली आहे.

आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हा परिषद , मजिपाचे अधिकाऱी आणि ठेकेदार यांच्यासह १४ गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली आहे. यावेळी १४ गाव सर्व पक्षीय विकास समिती अध्यक्ष लक्ष्मण पाटील, प्रदीप मोकाशी,मोतीराम गोंधळी यांसह अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -