घरठाणेलिंडा कंपनीकडून ठाणे पालिकेला १५ टन अतिरिक्त ऑक्सिजनचा साठा

लिंडा कंपनीकडून ठाणे पालिकेला १५ टन अतिरिक्त ऑक्सिजनचा साठा

Subscribe

महापौर नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नाला यश

राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना बेड, डरेमडीसीवर इंजेक्शन, आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ठाण्यातची देखील अशीच स्थिती आहे. ठाण्यातील पार्किंग प्लाझा रुग्णालय हे ऑक्सिजन नसल्याने पालिकेला बंद करावे लागले होते. त्यानंतर आता या रुग्णालयात स्वतःच्या प्लांट मधून १५ मेट्रिक टन ऑक्सीजन मिळणार आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल  लवकर सुरू होणार आहे.  या व्यतिरिक्त लिंडे कंपनीकडून १५ टन ऑक्सिजनचा अतिरिक्त पुरवठा होणार आहे. महापालिकेला हा अतिरिक्त साठा मिळणार असून हा ऑक्सिजन साठा मिळवण्यासाठी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के सातत्याने लिंडे कंपनीशी संपर्क साधत होते. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत लिंडे कंपनीने १५ टन ऑक्सीजनचा साठा येत्या दोन दिवसात देणार असल्याची घोषणा केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील कोरोना रुग्णांना ऑक्‍सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. तसेच महापालिकेचे जम्बो कोविड सेंटर देखील ऑक्सिजन अभावी पालिकेला बंद करावे लागले होते. त्यामुळे कोवीड रुग्णालयांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के पाठपुरावा लेंडे कंपनीशी करत होते. त्यामुळे गुरुवारी  ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली एक उच्चस्तरीय बैठक लिंडे कंपनीच्या  अधिकाऱ्यांसोबत पार पडली. या बैठकीत त्यांनी ठाणे महापालिकेला १५ टन ऑक्सिजन देण्याचे मान्य केले आहे.

- Advertisement -

ठाणे महापालिकेचे पार्किंग प्लाझा कोविड रुग्णालय येत्या चार दिवसात कार्यान्वित होणार आहे. निश्चितच कोरोना बाधित रुग्णांना उपचार घेणे सोयीचे होणार आहे. तसेच लींडे कंपनीने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा आभारी आहे. असे बैठकीनंतर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के म्हणाले.

कोवीड रुग्णालयांना अपुरा पडणारा ऑक्सिजनचा आता आता सुरळीत होणार आहे. ठाणे महापालिकेच्या दोन कोविड सेंटर सोबतच शहरातील आणखी 39 खाजगी रुग्णालयांना मागील काही दिवसापासून ऑक्सिजनचा कमी पुरवठा होत होता. परंतु खासगी रुग्णालयांना ज्या कंपनीकडून ऑक्सिजनचा पुरवठा होतो त्या कंपन्यांची देखील चर्चा झाली आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयांना सुरळीत ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल असे त्या कंपनीने आश्वासन दिले आहे.असे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -