घरठाणेजंजिरे धारावी किल्ल्यासाठी २५ कोटीचा निधी मंजूर

जंजिरे धारावी किल्ल्यासाठी २५ कोटीचा निधी मंजूर

Subscribe

किल्ले संवर्धन समिती तर्फे खासदार राजन विचारे यांचा ठाण्यात सत्कार

भाईंदर किनारपट्टीवरील पाली उत्तन येथील जंजिरे धारावी किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत २५ कोटीचा निधी मंजूर झाल्याने जंजिरे धारावी किल्ला संवर्धन समितीचे अध्यक्ष श्रेयश सावंत व सचिव रोहित सुवर्णा त्यांच्यासह शिवप्रेमी सदस्य यांनी मिळून खासदार राजन विचारे यांच्या सुरु असलेल्या चैत्र नवरात्रोत्सवाला भेट घेतली, त्या कार्यक्रम प्रसंगी त्यांचा समितीतर्फे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी आमदार मुजफ्फर हुसैन उपस्थित होते.

गेली २६ वर्ष दुर्लक्ष होत असलेल्या जंजिरे धारावी किल्ल्याच्या संवर्धनासाठी खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ३० कोटीची मागणी केली होती. त्यापैकी २५ कोटीचा निधी मंजूर झाला असून १० कोटीचा निधी महापालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामास लवकरच सुरुवात होणार आहे. असे किल्ले जतन समितीचे सचिव रोहित सुवर्णा यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीच्या काळात खासदार राजन विचारे यांनी किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी व गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या नरवीर चिमाजी अप्पा यांच्या पुतळ्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवून घेतल्या. नुकताच ६ मार्च २०२३ रोजी या किल्ल्यावर विजयमहोत्सव साजरा करण्यात आला होता. परंतु या कार्यक्रमास ते उपस्थित न राहिल्याने त्यांचे सन्मानचिन्ह व सत्कार करण्यासाठी सर्व शिवप्रेमी ठाण्यात आले आणि त्यांनी खासदार राजन विचारे यांचा सत्कार केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -