घरक्राइमभयंकर! लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचीच केली हत्या

भयंकर! लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचीच केली हत्या

Subscribe

लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ३१ वर्षीय व्यक्तीची कैचीच्या पात्याने भोसकून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री ठाण्यातील किसन नगर परिसरात घडली. या प्रकरणी श्रीनगर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून १२ तासाच्या आत दोन्ही आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.

चिंतन नरेंद्र पांचाळ (वय ३१) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चिंतन हा ठाण्यातील किसन नगर नंबर ३ येथील गुरुकृपा निवास येथे राहण्यास होता. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास परिसरात राहणाऱ्या लहान मुलांचे भांडण सुरु असताना चिंतन हा भांडण सोडवण्यासाठी पुढे असता त्याच वेळी मद्यधुंद अवस्थेत त्याच परिसरात राहणारे निहार बेलोसे (वय २२), आदित्य चौधरी (वय २५) हे आले. त्यांनी चिंतनला बाजूला करून तुला काय करायचे त्यांना भांडू दे असे बोलून शिवीगाळ सुरु केली. शाब्दिक वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन निहार आणि आदित्य या दोघांनी चिंतनाला मारहाण करून खिशातून कैचींचे पाते काढून चिंतनवर सपासप वार करून त्याला जखमी करून पळून गेले.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पो. नि. दिनकर चंदनकर हे घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी झालेल्या चिंतनला उपचारासाठी नजीकच्या रुग्णलयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात आदित्य आणि निहार या दोघांवर हत्याच गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांचा शोध घेऊन बारा तासाच्या आतच दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिली. अटक आरोपी आणि मृत दोघेही काही कामधंदा करत नव्हते. तसेच या तिघांत यापूर्वी देखील भांडण झाले होते. पूर्वीच्या भांडणाचा राग आणि घटनेच्या दिवशी लहान मुलावरून अचानक उदभवलेल्या वादातून चिंतनची आदित्य आणि निहार या दोघांनी मिळून हत्या केल्याची माहिती या गन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिनकर चंदनकर यांनी दिली.

हेही वाचा –

राज्यात रेस्टॉरंट्स, बार उघडण्याच्या नवीन वेळा जाहीर; शासन आदेश जारी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -