Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ठाणे महापालिका क्षेत्रातील अमृत योजनेची कामे प्रगतीपथावर

महापालिका क्षेत्रातील अमृत योजनेची कामे प्रगतीपथावर

अदानी समुहाच्या मालकीच्या जमिनीतुन हा प्रकल्प जात असल्याने व काही तांत्रीक बाबी व कोवीडमुळे काम हे संथगतीने चालु आहे.तसेच म्हारळ नाल्यावरही एसटीपी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ. शिंदे यांनी  दिले होते.

Related Story

- Advertisement -

केन्द्र शासनाच्या स्मार्टसीटी प्रकल्पांतर्गत दुसर्‍या टप्प्यात २०१६ साली देशभरातुन ९८ शहरांची निवड करण्यात आली होती. या शहंरामध्ये महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येच्या मानाने ७ व्या स्थानी असलेल्या कल्याण- डोंबिवली जुळ्या शहरांचा अंतर्भाव करण्यात आला होता. या प्रकल्पा अंतर्गत केन्द्र, राज्य, महापालिकेच्या निधीतुन शहरातील विविध नागरी विकासाचे प्रकल्प राबवुन शहरांचा कायापालट करणे हे मुख्य ध्येय ठेवले गेले होते. अशा या स्मार्टसीटी प्रकल्पा अंतर्गत असणार्‍या विविध प्रकल्पांपैकी एक ” अमृत योजना” हि एक योजना आहे.  मागील वर्षी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांनी घेतलेल्या आनलाइन बैठकीत अमृत योजनेचा प्रकल्प राबविण्यात कोणत्या महापालिका प्रगतीपथावर आहेत, याचा आढावा घेण्यात आला होता.दोनशे  कोटींपेक्षा जास्त रकमेचे प्रकल्प राबविण्यात १५ शहरांतून कल्याण -डोंबिवली महापालिकेस पूर्वी नवव्या क्रमांकाचे मूल्यांकन मिळाले होते. त्यात प्रगती होऊन मागील आढावा बैठकीत तिसर्‍या क्रमांकाचे मूल्यांकन देण्यात आले.

या मुल्यांकना नंतर महापालिकेने विविध योजनांकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सादर केले होते. या अहवालां अंतर्गत महापालिका हद्दीत अमृत योजनें अंतर्गत ४८० कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. या प्रकल्पांकरिता निधीचा ५० टक्के हिस्सा महापालिकेने उभा करायचा आहे. ३३ टक्के हिस्सा केंद्र सरकारकडून, तर १७ टक्के हिस्सा राज्य सरकारकडून प्राप्त होणार आहे. त्यामध्ये मलनि:सारण योजनेचा पहिला व दुसरा टप्पा, २७ गावांकरिता स्वतंत्र पाणीपुरवठा योजना, महापालिका हद्दीत हरितपट्टा विकसित करण्याचे काम मंजूर करण्यात आले होते. मलनि:सारण प्रकल्पासाठी पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्याकरिता २८४ कोटी रुपये खर्चाची योजना आहे. २७ गावांतील पाणीपुरवठा योजना १९२ कोटी रुपये खर्चाची आहे. चार कोटी रुपये हरितपट्टा योजनेवर खर्च करण्यात येणार आहेत. मलनिःसारण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम ७५टक्के, तर दुसर्‍या टप्प्याचे काम ६०टक्के झाले आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम २५ टक्के झाले आहे. हरितपट्टा योजना उंबर्डे, नेतिवली येथे विकसित करण्यात आली आहे.

- Advertisement -

म्हारळ, मोहना एनआरसी, अम्बिवली, अटाली, वड़वली, गाळेगाव चे मल्ल निसारण व सांडपाणी हे कोणतीही प्रक्रिया न करता उल्हास नदी मध्ये सोडले जात आहे, त्यावर उपाय म्हणुन अम्बिवली येथे एकवीस एमएलडी  क्षमते चे एसटीपी व मोहना एनआरसी कॉलोनी येथे पम्पिंग स्टेशन उभारण्याचे काम चालु आहे, मोहना व गाळेगांव नाल्या चे सांडपाणी पम्पिंग करुन अम्बिवली एकवीस एमएलडी चे निर्माणाधीन एसटीपी मध्ये प्रक्रिया करुन काळू नदीत सोडले जाणार आहे.उल्हास नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली हद्दीतील पाच एसटीपीचे काम मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे अश्वासन देण्यात आले होते. अदानी समुहाच्या मालकीच्या जमिनीतुन हा प्रकल्प जात असल्याने व काही तांत्रीक बाबी व कोवीडमुळे काम हे संथगतीने चालु आहे.तसेच म्हारळ नाल्यावरही एसटीपी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ. शिंदे यांनी  दिले होते. तातडीची बाब म्हणून या नाल्याच्या मुखाशी बांध घालून सांडपाणी थेट नदीत मिसळणार नाही, याची काळजी घेण्यासही सांगीतले होते.दिले

सद्यस्थितीत हे तीनही नाले बंधारे टाकून बंद करण्यात आलेले नाहीत, पम्पिंग व एसटीपी चे काम ही तांत्रिक अडचणी मुळे फ़क्त ७० टक्के पूर्ण झालेले आहे. म्हारळ नाल्यावर अजुन कोणत्याही कामास सुरुवात झालेली नाही, मोहना बंधारातिल गाळ काढून स्वच्छ्ता करणे हे अभियान ही सुरु झाले नाही,तांत्रिक अडचणी मुळे अर्धवट स्थितित असलेले एसटीपी व गेबीएन बंधारे नोव्हेंबर अथवा डिंसेबर अखेर पर्यंत पुर्ण होतील असे आश्वासन  कडोंमपा शहर अभियंता सपना कोळी यांनी दिले आहे. त्यामुळे कल्याण परिसराची जीवनवाहिनी उल्हासनदी प्रदुषण मुक्त होण्यास पुढील वर्षापर्यंत वाट पहावी लागणार आहे.

- Advertisement -

” कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अमृत योजने अंतर्गत अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. जमिन अधिग्रहण, तांत्रीक अडचणी व कोवीडच्या परिस्थितीमुळे काही कामांमध्ये अडथळे निर्माण झाले होते. सध्यस्थितीला महापालिका क्षेत्रात पाच एसटीपीची कामे चालु असुन मशिनरीजची टेंडर्स काढण्याचत आली आहेत. एसटीपी अंतर्गत ऐंशी टक्के कामे पुर्ण झाली असुन नोव्हेंबर अखेर पर्यंत हि कामे पुर्णत्वास येणार आहेत.”
-सपना कोळी, शहर अभियंता कल्याण -डोंबिवली महानगरपालिका

- Advertisement -