एटीएस प्रमुख जयजीत सिंह ठाणे कार्यालयात हजर, मोठे मासे गळाला लागणार?

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तपासाला वेग

ATS chief Jayjit Singh present at Thane office big accuse will be caught?
एटीएस प्रमुख जयजीत सिंह ठाणे कार्यालयात हजर, मोठे मासे गळाला लागणार?

मनसुख हिरेण प्रकरणाचा तपास एटीएस पथक करत आहे. मनसुख हिरेण यांचा मृतदेह ठाण्यातील रेतीबंदर येथील खाडीत सापडला होता. याबाबत एटीएस पथकाला महत्त्वाची माहिती मिळाली आहे. यासाठी ठाणे येथील एटीएसच्या कार्यालयात एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग हे स्वतः हजर असून त्यांनी मुंबईतील एटीएसच्या अधिकाऱ्यांना ठाणे कार्यालयात बोलावून घेतले आहे. त्यात चकमक फेम दया नायक याचा देखील समावेश आहे. या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असून त्याची हालचाल एटीएस मध्ये सुरू झाली आहे.

मागील काही दिवसांपासून मनसुख हिरेन प्रकरण आणि सचिन वाझे प्रकरण महाराष्ट्रात चांगलेच गाजते आहे. मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणाचे धागे दोरे एकामेकांत गुंतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास एटीएस आणि एएनआय तपास यंत्रणा करत आहेत. मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी एटीएस पथकाकडे आहे तर एएनआयकडे मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणाची चौकशी सुरु आहे. याच प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटक झालेला विनायक शिंदे आहे कोण?


मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात अनेक पुरावे एटीएस पथकाच्या हाती लागले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एटीएस पथकाच्या तपासाला वेग मिळत आहे. एटीएसचे प्रमुख जयजीत सिंह हे ठाणे कार्यालयात दाखल झाले आहेत. तसेच मुंबईतील एटीएसच्या अधिकाऱ्यांना ठाणे कार्यालयात बोलावून घेतले आहे. यामध्ये चकमक फेम, इन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांचाही समावेश आहे.

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पहिली अटक करण्यात आली आहे. यानंतर एटीएसच्या पथकाला वेग आला आहे. मनसुख प्रकरणात २ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक निलंबित पोलीस कॉन्स्टेबल आणि एका बुकीचा समावेश आहे.