घरठाणेकर, दरवाढ नसलेला भिवंडी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

कर, दरवाढ नसलेला भिवंडी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

Subscribe

शंभर एमएलडी पाणीपुरवठ्यासह शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा दरवाढ नसलेला ८२२ कोटी ४३ लाख रुपयाचा मूळ अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांच्याकडे मंगळवारी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सादर केला. सन २०२१-२२ सुधारित अंदाजपत्रकात रुपये ८२० कोटी ३२ लाख, ८७ हजार तर सन २०२२-२३ ची रक्कम १२ लाख ४२ हजार शिल्लक दर्शविणारे रुपये ८२२ कोटी, ४३ लाख ३२ हजार रकमेच्या मूळ अंदाजपत्रक आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्थायी समितीत सादर केला. स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी स्थायी सभागृह स्थायी समिती सदस्य विलास आर पाटील, प्रशांत लाड, हलीम अन्सारी तर अन्य सदस्य हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सभेत सहभागी झाले होते.

अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केल्यावर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, या अर्थसंकल्प मधील भांडवली जमाखर्च व त्याचा अनुषंगाने अ अर्थसंकल्प महसुली जमा, खर्च, तर क म्हणजे म्हणजे पाणी पाणी पुरवठा व मलनिस्सारण, दुर्बल घटक दीव्यांग कल्याण, वृक्ष संवर्धन, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन,महिला व बालकल्याण अर्थसंकल्प दिव्यांग कल्याण अर्थ वृक्षसंवर्धन शिक्षण विभाग परिवहन अशा ९ विभागात तयार करण्यात आला आहे.

- Advertisement -

महापालिकेचा महसूल उत्पन्न पाहता शासन निर्णयाप्रमाणे दोन टक्के इतकी रक्कम म्हणजेच 885.33 लाख नगरसेवक निधी म्हणून तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण दुर्बल घटक दिव्यांग कल्याण या अर्थसंकल्पात करता शासन निर्णयाप्रमाणे महापालिकेच्या महसूल उत्पन्नातून बांधील खर्च वजा जाता उर्वरित उत्पन्नाच्या पाच टक्के रक्कम म्हणजेच 65 पण 49 स्वतंत्ररीत्या दर्शनी तरतूद करण्यात आली आहे.

या अंदाजपत्रकात मुख्यतः शहर पाणीपुरवठा योजना यावर भर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून भातसा धरणातून शंभर दशलक्ष लिटर पाणीपुरवठा योजनेकरीता 385 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. याकरिता पालिकेच्या हिश्‍श्‍याची स्वतंत्र तरतूद या अंदाजपत्रकात तयार करण्यात केलेली आहे. त्याकरता स्वतंत्र खाते तयार करण्यात आलेलेअसून त्यात तरतूद करण्यात आली आहे. शहरात तयार झालेले जलकुंभ सुरू करणे, नागरिकांना सामान पाणी वितरण करणे यावर भर देण्यात आला आहे.

- Advertisement -

तसेच शाळेचा जुन्या इमारती बांधकाम विभागांतर्गत शाळेच्या इमारती दुरुस्त करणे त्यासाठी शाळेच्या स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक असून या कामी शासनाकडून निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महानगरपालिकेच्या कर्मचारी वसाहत इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती करणे या कामी देखील शासनाकडे प्रयत्न करण्यात येणार आहेत. स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहात शासनाकडून दहा कोटी रुपये अनुदान निधी मंजूर झाले आहे. शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर या निधीमधून नाट्यगृहाची सुधारणा करण्यात येईल.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करणेकामी दहा कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे, वराला तलाव, भादवड तलाव संवर्धन व सुशोभीकरण काय हे काम देखील शासनाच्या मार्फत हाती घेण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य अंतर्गत कचरा वर्गीकरण, नवीन खरेदी केलेल्या वाहनाद्वारे वर्गीकृत कचऱ्याचे संकलन, आयसीटी बेस्ट टेक्नॉलॉजी द्वारे पर्यवेक्षण एम आर एफ शेड उभारून सुका व ओला कचरा व प्रक्रिया करणे, कचर्‍यापासून हरित कंपोस्ट खत बनवणे, प्लास्टिक बंदी प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, शहर स्वच्छतेच्या मानांकनात सुधारणा करणे अशा प्रकारच्या तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहेत.हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आहे, असे मनोगत आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केले आहे. सरतेशेवटी आयुक्त यांनी महापौर, उपमहापौर, सभापती स्थायी समिती, सर्व सदस्य , सर्व नगरसेवक आणि अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच शहरातील नागरिक यांचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -