घरठाणेआर्ट गॅलरी कोविड रुग्णालयाचा ठेकेदार बदला सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत यांची मागणी

आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयाचा ठेकेदार बदला सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत यांची मागणी

Subscribe

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्या कमी होत आहेत. तरीही शहराच्या मध्यवर्ती ठिकणी असलेल्या पालिकेच्या आर्ट गॅलरीमधील कोविड रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे या रुग्णालयात कोविड रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत.त्यामुळे या रुग्णालयाचे संपूर्ण व्यवस्थापन अन्य ठेकेदाराकडे देण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांचे निवेदन कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या निवेदनात आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयातील अस्वच्छतेसह विविध प्रकारच्या गैरसोई आणि रुग्णांना होणाऱ्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले असून या रुग्णालयातील डाॅक्टरांच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप नोंदविण्यात आला आहे. या डॉक्टरांवर कारवाई करण्याचीही मागणीही करण्यात आली आहे.

या रुग्णालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या स्मशानभूमित कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका चालक हे पाच हजार रुपये घेत आहेत. या लुटीला रुग्णालय प्रशासनच जबाबदार आहे. यासाठी शासनाने रुग्णवाहिका ताब्यात घेऊन त्यांची सेवा विनामूल्य करण्यात यावी. या रुग्णालयात दाखल रुग्णांची काय स्थिती आहे. त्याची माहिती रुग्ण नातेवाईकांना मिळत नाही, तसेच याच रुग्णालयात महापालिकेचे कोविड लसीकरण केंद्र असून लसीकरणासाठी ऑनलाईन नाव नोंदणीही तळागाळातील नागरीकांना अशक्य असल्याने ही पध्दत बंद करण्यात यावी, आदी स्वरुपाच्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार होऊन रुग्णालयातील दुरवस्थेत सुधारणा न झाल्यास येथील जनता रस्त्यावर उतरेल असा इशासाठी अजय सावंत यांनी या निवेदनात दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -