घरठाणेअखेर बदलापूरमध्ये धावणार इलेक्ट्रिक बस; नागरिकांच्या मागणीला यश

अखेर बदलापूरमध्ये धावणार इलेक्ट्रिक बस; नागरिकांच्या मागणीला यश

Subscribe

बदलापूर : मागील वर्षी बदलापूर शहरात इलेक्ट्रिक बस धावणार या चर्चेला उधाण आलं होतं. कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई पालिकेकडून बदलापूर पालिकेला दहा इलेक्ट्रिक बस देण्यात येणार होत्या; मात्र तांत्रिक अडचणीमुळे कल्याण -डोंबिवली महापालिकेची (Kalyan-Dombivli Municipal Corporation) बस खरेदी प्रक्रिया रखडली आणि बदलापूरमध्ये बस सेवा सुरू होण्यास उशीर झाला. येत्या दोन महिन्यात शहरांतर्गत बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्य अधिकारी योगेश गोडसे (Yogesh Godse) यांनी दिली आहे. तसेच शहरातील मुख्य मार्गांचे सर्वेक्षण करून याबाबतचा आराखडा सुद्धा कल्याण-डोंबिवली महापालिकेला पाठविण्यात आला आहे. (Electric buses will run in Badlapur city)

बदलापूर शहरात शासकीय परिवहन सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. शहरात रिक्षाव्यतिरिक्त इतर पर्याय नसल्याने नागरिकांना रिक्षानेच प्रवास करावा लागतो. त्यामुळे परिवहन सेवा सुरू व्हावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात होती. अखेर एक वर्षानंतर नागरिकांच्या मागणीला आता यश येणार आहे. शहरातील मुख्यमार्गांचा आराखडा एका खासगी संस्थेने बदलापूर पालिकेकडे सादर केला होता. यासाठी सिटीजन वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांनी सुद्धा मदत केली होती. त्यानंतर हा आराखडा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पाठविण्यात आला आहे. एका महिन्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून इलेक्ट्रिक बसची खरेदी करण्यात येणार असून यातील दहा बस बदलापूर शहरात धावणार आहेत. याबाबतची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिली आहे. बदलापूर शहरात लवकरच बस सेवा सुरू होणार असल्याने नागरिकांच्या मागणीला अखेर यश आले आहे.

- Advertisement -

दरम्यान शहरात बस सेवा सुरु करण्यासाठी बस खरेदी, कर्मचारी आणि इतर सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्याशिवाय हा उपक्रम फायद्याचा नसला तरी नागरिकांच्या सोयीसाठी सुरू ठेवावा लागतो. त्यामुळे पालिकेने स्वतःची परिवहन सेवा सुरू न करता इतर महानगरपालिकांची परिवहन सेवा बदलापूरकरांना देऊन प्रवाश्यांची होत असलेली गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न बदलापूर पालिकेने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -