घरठाणेठाण्यात १०२ वर्षीय आजींनी केली कोरोनावर मात

ठाण्यात १०२ वर्षीय आजींनी केली कोरोनावर मात

Subscribe

काही दिवसांपूर्वीच आजींचा १०२ वावाढदिवस हा रुग्णालयातच साजरा करण्यात आला होता.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूमधेही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे.  कोरोनाबद्दल अनेक बातम्या प्रसारमाध्यमातून समोर येत आहेत. त्यामुळे सगळ्यांचे मन हेलावून गेले आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण जगू की मरू असे अनेक लोकांना वाटत असते. मात्र त्या रुग्णांना प्रेरणा देणारी एक सकारात्मक घटना ठाण्यातून समोर आली आहे. ठाण्यातील एका १०२ वर्षीय आजींना कोरोनाला धोबीपछाड दिली आहे. आजींना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आजींनी जबरदस्त लढा देत कोरोनावर मात केली आहे. कोरोनाला हरवून  त्या सुखरुप घरी परतल्या आहेत.  काही दिवसांपूर्वीच आजींचा १०२ वावाढदिवस हा रुग्णालयातच साजरा करण्यात आला होता.

सुशीला पाठक अस या आजींच नाव आहे. या मुंबईतील जुहू येथे राहतात. ७ एप्रील रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना कुठेही बेड मिळत नव्हता. शेवटी ठाण्यातील हॉरिजन प्राइम या हॉस्पीटल मध्ये त्यांना बेड मिळाला. व त्यांच्यावर उपचार सुरु झाले. आजींच वय जास्त असल्याने पाठक कुटूंबीय घाबरून गेले होते. मात्र आजींनी कोरोनावर मात केली आणी कोरोनाला चितपट केले. त्या सुखरुप घरी परतल्या आहेत.

- Advertisement -

आजींवर १० दिवसांपासून उपचार सुरु होते. डॉक्टरांनी आजींचा १०२ वा वाढदिवसही त्यांनी साजरा केला.आता तब्येत आता बरी आहे. डॉक्टरांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. डॉक्टर कायम आमच्या संर्पकात होते. यांनी वेळोवेळी फोनवर आजींच्या तब्येतीबद्दल माहिती दिली. आणी हॉस्पिटल ने बिल ही माफक प्रमाणात आकारले त्यासाठी मी च्यांचा आभारी आहे. असे आजीचे नातू सुरेश म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -