घरठाणेअंबरनाथमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा सॅटिस प्रकल्पात समावेश; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

अंबरनाथमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा सॅटिस प्रकल्पात समावेश; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

Subscribe

अंबरनाथ शहरातील इतर विविध विकासकामांवर ही सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याने अंबरनाथ शहरातील विकास कामे जलदगतीने मार्गी लागणार असल्याचे आमदार डॉ.किणीकर यांनी यावेळी सांगितले.

अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिम भागातील आरक्षणाचा एम.एम.आर. डी. ए.मार्फत SATIS अंतर्गत विकास करण्यात येणार असून यामध्ये पूर्व भागात दोन मजली पार्किंगची सुविधा निर्माण करणेत येणार आहे. तसेच नगरपरिषदेने बांधलेल्या कै. य.मा. चव्हाण नाट्यगृह पार्किंगच्या इमारतीची सांगड घालून तयार करण्यात आलेल्या नवीन प्रस्तावाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. यानुसार हे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

यांनी एम. एम.आर. डी.ए.च्या अधिकाऱ्यांना दिल्या. अंबरनाथ मधील विविध प्रलंबित विकास कामासंदर्भात आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एका विशेष बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये अंबरनाथ शहरांमधील विविध प्रलंबित विकास कामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अंबरनाथ शहरातील इतर विविध विकासकामांवर ही सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याने अंबरनाथ शहरातील विकास कामे जलदगतीने मार्गी लागणार असल्याचे आमदार डॉ.किणीकर यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -


खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगराध्यक्षा सौ.प्रज्ञा बनसोडे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, माजी नगरसेवक उमेश गुंजाळ, सुभाष साळुंखे, रवींद्र पाटील, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ, अभियंते अशोक पाटील, हावल, राजेश तडवी, नगररचनाकार विवेक गौतम, मनोज तारानी, तसेच एम.एम.आर. डी. ए.चे अधिकारी उपस्थित होते.


हे ही वाचा – ठाकरेंच्या समर्थकासाठी शिंदेंचे समर्थक आले धावून, बंड्या साळवींसाठी आमदार भोईर यांची बॅटिंग 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -