दुखापतीमुळे भारताचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज टी-20 विश्वचषकातून बाहेर

टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. दुखापतीमुळे भारताचा डेथ ओवर स्पेशलिस्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. दुखापतीमुळे भारताचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. (Jasprit Bumrah likely to be ruled out of T20 World Cup)

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पाठीच्या समस्येमुळे तो वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. जसप्रीत बुमराह याच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया होणार नाही, मात्र तो चार ते सहा महिने क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

पाठीच्या या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही बाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात बुमराहच्या जागी दीपक चहरला संघात स्थान देण्यात आले. बुमराहने आशिया चषकामध्ये न खेळल्यानंतर पुनरागमन केले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तो खेळला होता. दुखापतीमुळे बुमराह आशिया कपमध्ये खेळला नव्हता. त्याच्या जागी आता मोहम्मद शमी किंवा स्टँडबाय म्हणून निवडले आहे. दीपक चहर यांचे नाव आघाडीवर आहे. कोरोना संसर्गामुळे शमी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळला नाही. मात्र आता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.


हेही वाचा – IND vs SA : टी-20 क्रिकेटमध्ये नवा विक्रम करण्यासाठी माजी कर्णधार विराट सज्ज