घरठाणेपावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

Subscribe

पालकमंत्र्यांनी दौऱ्यात साधला चाळीतील नागरिकांशी संवाद 

 ठाणे शहरात व्यापक प्रमाणात स्वच्छता, सुशोभिकरण, रंगरंगोटीची कामे सुरू असून मंगळवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या समवेत शहरातील चेंदणी कोळी वाडा परिसरातील चाळीतील नागरिकांशी संवाद साधत रस्ता दुरुस्ती, गटर्स, पाईपलाईन, शौचालय, स्वच्छता कामाची पाहणी केली. पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होवू नये यासाठी सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान कोपरी खाडीलगत वॉटरफ्रंट येथील नुतन शौचालयाचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
शहरात स्वच्छते सोबतच सुशोभिकरणाचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. यासोबतच काही चाळीमध्ये पाणी पुरवठा, गटर्स, ड्रेनेज, शौचालय दुरुस्तीची किरकोळ कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, पावसाळ्यात यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी सिडको बस डेपो येथून चालतच या पाहणी दौऱ्याची सुरुवात  झाली.
याठिकाणी असणाऱ्या कोळी समाज मंदिराची डागडुजी करून त्याचे सुशोभिकरण करणे, सिडको बस थांब्यासाठी शेड मारणे आदी कामे करण्या सोबतच रेल्वे ब्रिजखाली रंगरंगोटी कामाचीही त्यांनी पाहणी करून सुशोभीकरणाची कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर पालकमंत्री त्यांनी चेंदणी कोळीवाडा येथील प्रत्येक चाळीमध्ये जावून प्रत्यक्ष पाहणी केली. तेथील पाणी प्रश्न, ट्रेनेज लाईन,शौचालय गटर्स आदीची पाहणी करून अत्यावश्यक दुरुस्ती तात्काळ करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.तसेच दुभाजकाची रुंदी वाढविणे त्यामध्ये झाडांची लागवड करणे, नाल्यालगत भिंती बांधणे, खाडीचे पाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी भिंत बांधणे आदी सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.
 ठाणे स्मार्ट सिटी लि.अंतर्गत कोपरी खाडीलगत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट अंतर्गत सुशोभीकरणाचे अंतिम टप्प्यातील काम सुरू असून या सर्व कामाची पालकमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. या ठिकाणी करण्यात अष्टविनायक चौक ते गणेश विसर्जन घाट (मीठबंदर रोड ) रस्ता व पदपथाचे नूतनीकरण, शौचालय, अॅम्पी थिएटर, बैठक व्यवस्था, उद्यान, वाहनतळ, मनोरंजनात्मक सुविधा, विद्युत रोषणाई, जेट्टी रस्त्याचे नूतनीकरण, दशक्रिया विधीकरिता चौथरा आदी त्यांनी सुविधांची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -