घरठाणेप्रभाग रचनेतील सिमांकनावर सर्वाधिक हरकती, सुचना

प्रभाग रचनेतील सिमांकनावर सर्वाधिक हरकती, सुचना

Subscribe

आकडा पोहचला अंदाजे १७०० पार, २६ फेब्रुवारीला एकाच दिवशी होणार निपटारा शेवटच्या दिवशी अक्षरशः हरकत, सूचनांचा धो-धो पाऊस 

आगामी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभाग रचनेच्या हरकत , सुचनांच्या शेवटच्या दिवशी अक्षरशः हरकत, सुचनांचा धो-धो पाऊस पडला आहे. जवळपास १,३५० हरकत, सुचना आल्या ने हा आकडा आता १,७०० पार झाला आहे. यामध्ये सीमांकनांवर सर्वाधिक हरकत, सुचना असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत असून एकाच दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारीला या हरकत, सुचनांचा निकाल लावण्यात येणार  आहे.
 ठाणे महापालिकेच्या निवडणुका आता कधीही होऊ शकतात.त्यासाठी प्रभाग रचनेचा मसुदा महापालिका प्रशासनाने १ फेब्रुवारी रोजीच प्रसिद्ध केला होता.त्यानंतर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली.  मात्र प्रभाग रचनेवरून राजकीय पक्षांमध्ये मोठे वादळ उठले होते.  सुरुवातीच्या टप्प्यात, भाजपने राष्ट्रवादी आणि सत्ताधारी शिवसेनेकडे बोट दाखवले आणि दावा केला की दोघांनी मिळून निवडणूक आयोगाला त्यांच्या पसंतीचा मसुदा तयार केला. तर काँग्रेसनेही या प्रकरणी आवाज उठवला.
गेल्या आठवड्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्रभाग निर्मितीवरून ‘तू-तू, मैं मैं’ही पाहायला मिळाले. तर प्रभाग रचनेबाबत हरकती व सूचना या शनिवारी आणि रविवारी स्वीकारण्यात आल्या तसेच त्या दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणि सोमवार, १४ फेब्रुवारीची मुदत संपेपर्यंत सुमारे १७०० नागरिकांनी महापालिकेच्या निवडणूक विभागात हरकती नोंदवल्या आहेत. तर १३ फेब्रुवारी दरम्यान अवघ्या ३५८ हरकती आणि सुचना आल्या होत्या. तर सोमवारी सांयकाळी सात वाजेपर्यंत जवळपास १३५० हरकत, सुचना आल्या होत्या. त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
याचदरम्यान ढोकळी, बाळकुम व इतर भागातून म्हणजे प्रभाग ३, ४ आणि ९ मधून १०० तक्रारी आल्याचे समोर आले आहे. यामध्ये सोसायटीच्या दोन भागांचे सीमांकन, सोसायटीच्या गेटचे विभाजन अशा चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे या तक्रारींमध्ये दिसून आले आहे. बर्‍याच प्रकरणांमध्ये, पत्राचा मजकूर, म्हणजे लेखणीची भाषा सारखीच असते आणि स्वाक्षरी करणार्‍यांची नावे वेगळी असतात. मतदार यादीवरून अनेकांनी आक्षेप नोंदवल्याचेही दिसून आले आहे.  काही ठिकाणी प्रभागातील लोकसंख्या दुसऱ्या प्रभागात हस्तांतरित होऊ शकते, हे लक्षात आल्याने अनेक नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आक्षेप घेत ही लोकसंख्या त्यांच्या प्रभागात वर्ग करण्याची मागणी केली.  तर येत्या २६ फेब्रुवारी रोजी सर्व हरकतींवर सुनावणी होणार असल्याचे ठाणे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -