घरठाणेएक श्वानाच्या नसबंदीवर पालिका प्रशासन करणार १६४० रुपये खर्च

एक श्वानाच्या नसबंदीवर पालिका प्रशासन करणार १६४० रुपये खर्च

Subscribe

महापालिका सुमारे दीड कोटी रुपये खर्च करणार

मागील तीन वर्षांपासून श्वानांवरील नसबंदीचा निर्णय महापालिकेच्या महासभेत घेता आलेला नाही. त्यामुळे शहरातील श्वानांनी संख्या आता वाढल्यामुळे ठाणेकर नागरिक त्रस्त झाले आहे. श्वानाच्या या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी नसबंदी हा पर्याय असल्याने श्वानांच्या नसबंदीला अखेर महापालिकेने मुहूर्त काढला आहे. यासाठी महापालिका सुमारे दीड कोटी रुपये खर्च करणार असून एका श्वानाच्या नसबंदीसाठी १६४० रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आह. ही नसबंदी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे अनेकांना जखमी झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्याचबरोबर भटक्या श्वानांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांच्या समस्या वाढत आहेत. मात्र, श्वानांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्यांची नसबंदी केली जाते. त्याचे कंत्राट महापालिकेने खासगी कंत्राटी कंपनीला दिले होते. महापालिका कार्यक्षेत्रात २००४ ते २०१९ पर्यंत आठ कोटी रुपये खर्च करून ५८ हजार ५३७ भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

दुसरीकडे ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या महासभेपूर्वी प्रशासनाने या कामासाठी पुन्हा १.५५ कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र नगरसेवकांनी श्वानांच्या नसबंदी शस्त्रक्रियेला आक्षेप घेत हा प्रस्ताव मंजूर केला नव्हता. दोन महिन्यांनंतर पुन्हा महासभेत हा मुद्दा उपस्थित झाला होता. संबंधित कंपनीचा करार संपल्याने गेल्या वर्षभरापासून श्वानांवर होणारी नसबंदी शस्त्रक्रिया बंद असल्याचे प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आले. यानंतर याबाबत नवीन निविदा काढण्यासाठी तीन वर्षांपूर्वी आणलेल्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली नाही. अशा स्थितीत श्वानांची नसबंदी पुन्हा सुरू होऊ शकली नाही. या मोहिमेसाठी ठाणे पालिकेने दिलेल्या प्रस्तावानुसार एकूण १ कोटी ५५ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून यातून एकूण ९ हजार श्वानांच्या नसबंदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. खासगी कंपनीमार्फत नसबंदी मोहीम राबविण्यात येणार आहे.

नसबंदी शस्त्रक्रियेसाठी मोजणार १६४० रुपये
श्वानांना शस्त्रक्रिया केंद्रात आणण्यासाठी आणि इतर सुविधांसाठी खासगी कंपनीने ठाणे पालिकेला प्रति शस्त्रक्रियेसाठी १६४० रुपये दिले आहेत.प्रस्ताव प्राप्त होण्यास उशीर झाल्याने नसबंदीला विलंब झाला. या कामासाठी तयार केलेला प्रस्ताव उशिरा प्राप्त झाल्याचे पालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी क्षमा शिरोडकर यांनी सांगितले. सध्या जून महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.आता मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजे १ मार्चपासून श्वानांची नसबंदी मोहीम सुरू होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -