Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे अनैतिक संबंधातून हत्या; आरोपी गजाआड

अनैतिक संबंधातून हत्या; आरोपी गजाआड

हत्यारा निघाला प्रियकार

Related Story

- Advertisement -

पत्नीसमवेत परपुरुषाचे असलेले अनैतिक संबंधामुळे चिडलेल्या पतीने तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना टिटवाळा नजीक असणाऱ्या ओझरली गावात घडली होती. या प्रकरणी २७ वर्षीय व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह भातसा नदीत फेकल्याप्रकरणी  टिटवाळा पोलिसांनी बुटा बाल्या जाधव या २५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. २ एप्रिल सकाळी ११  वाजताच्या सुमारास उमेश बबन वाघे (वय २७) याचा मृतदेह भातसा नदीजवळील ओझाळी गावात असणाऱ्या कपिल पाटील यांच्या बंगल्याजवळ सापडला होता.पोलिसांनी आरोपीची चौकशी केल्यानंतर भुता यांच्या पत्नीसमवेत उमेशचे अनैतिक संबंध असल्याचे समजले. त्यातच आरोपी बूटा याची पत्नी माहेरी निघून गेल्याने नांदायला येत नव्हती.सोडचिठ्ठी मागून नांदायला येण्यास नकार दिल्याने या गोष्टीचा राग येऊन आरोपी बुटा याने उमेशची लोखंडी रॉडने हत्या केली.

 

- Advertisement -

पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत उमेश वाघे याचे दोन्ही पाय दोरीने बांधून त्याला दगड बांधून भातसा नदीच्या पात्रात फेकून दिले. याबाबत मृताची पत्नी हिने टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल केला होता. टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू वंजारे यांनी सांगितले की, आरोपीला कल्याण परिसरातून  शनिवारी अटक करण्यात आली व त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.अधिक तपास टिटवाळा पोलिस करत आहेत.

- Advertisement -