घरठाणेबापाची चप्पल आली म्हणजे बापाची अक्कल येत नसते

बापाची चप्पल आली म्हणजे बापाची अक्कल येत नसते

Subscribe

माजी खासदारांना आजी खासदारांना प्रतिटोला

कळवा-खारेगाव रेल्वे उड्डाणपुल लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक टीका टाळावी, असा सल्ला दिला. याला चोवीस तास होत नाही तोच वैयक्तिक टिका सुरू झााल्या आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठोपाठ माजी खासदार आनंद परांजपे यांनी टीकेचा सूर आवळत, डॉ. आव्हाड यांनी बापाच्या भूमिकेने सांभाळून घेण्याचे वक्तव्य केले होते, मात्र बापाची चप्पल आली म्हणजे बापाची अक्कल येत नसते, असा टोला परांजपे यांनी डॉ. शिंदे यांना लगावला आहे.

शनिवारी दुपारी कळवा- खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि नंतर खासदार श्रीकांत शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. शिंदे यांच्या टिकेला उत्तर देताना परांजपे म्हणाले, आपल्या भाषणात स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक टीका टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरही खासदार डॉ शिंदे आणि महापौर म्हस्के यांनी टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी रविवारी माजी खासदार परांजपे पत्रकार परिषद बोलवली होती. त्यावेळी बोलताना परांजपे यांनी खारेगावाच्या कामाचा उल्लेख करताना डॉ. आव्हाड यांचा घटनाक्रम चुकला असेल मात्र उड्डाणपुलाच्या आमचा पाठपुरावा आहे, हे पुन्हा एकदा त्यांनी सांगितले आहे. डॉ. शिंदे यांना श्रेय घ्यायचे आहे, त्यांनी ते श्रेय घ्यावे, मात्र गृहनिर्माण मंत्र्यांवर, राष्ट्रवादी पक्षावर आणि कार्यकर्त्यांवर आघात झाला तर मी प्रतिउत्तर देणारच असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

महापौर कलियुगाचे नारदमुनी शोभतात
डॉ. आव्हाड यांनी महापौरांना दिलेली नारद मुनींची उपमा ही योग्य तशी होती. महापौर हे कलियुगातील नारद असल्याची टीका परांजपे यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर केली आहे. सत्य युग, त्रेता युग अणि द्वापर युगात नारद मुनींनी धर्माचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. मात्र महापौर हे कलियुगाचे नारद मुनी असून त्यांना दिलेली उपमा अचूकच असल्याचेही परांजपे यांनी सांगितले.

इतर कामांचीही टाइम लाईन द्यावी-परांजपे
डॉ. शिंदे यांनी खारेगाव उड्डाणपुलाचा पाठपुरावा करण्याबरोबर मतदार संघात विकास कामे झाली असल्याचा दावा केला आहे. जर विकास झाला असेल तर कल्याण टर्मिनस, शीळफाटा, मानकोली मोठा गावं ब्रिज, दिवा उड्डाणपूल कधी होणार याची टाइम लाईन देखील खासदारांनी द्यावी असे आव्हानही परांजपे यांनी शिंदे यांना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -