घरठाणेपूनम हिलम कातकरी समुदायातील पहिली वकील

पूनम हिलम कातकरी समुदायातील पहिली वकील

Subscribe

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून पूनमचा सत्कार

आदिवासी मागास घटकामधील कातकरी समाजातील पूनम विजय हिलम हिने पाहिली वकिली सनद प्राप्त केल्याने तिचे सर्व थरातून कौतुक केले जात आहे. तालुक्यातील वाफे येथे वास्तव्यास असलेल्या पूनम हिलम च्या दैदिप्यमान यशाची दखल घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून पूनमचा सत्कार करण्यात आला.

शहापूर जवळील वाफे येथील कातकरी समुदायातील पूनम हिने शहापुरातील ग.वि.खाडे विद्यालय, सोनुभाऊ बसवंत कॉलेज येथे तर वकिली चे शिक्षण ठाणे येथे घेतले. कातकरी समाज हा मूळ आदिवासी मानला जातो. आदिवासींमधील सगळ्यात मागे पडलेला हा कातकरी घटक असून या कातकरी समाजातील मुलांमध्ये शिक्षण घेण्याचे प्रमाण नगण्य आहे.

- Advertisement -

कुठे सालगडी तर कुठे वेठबिगारी करून उदरनिर्वाह करणारा हा समुदाय असून त्या समाजातील पूनमला वकील सनद घेतल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पूनमचे शहापुर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तिच्या घरी भेट घेऊन तिचे व तिच्या पालकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या वेळी शिवसेना तालुका प्रमुख कुलदीप धानके तालुका सचिव रवि लकडे, प्रदेश प्रतिनिधी महादेव कोळी, ठाणेज़िल्हा समाजउन्नति संघ उपाध्यक्ष विजय शिंदे, तालुका युवा अधिकारी स्वानंद शेलवले, शाखाप्रमुख अवि कासार तालुका समन्वयक अतिष अधिकारी, उपतालुका अधिकारी योगेश लुटे, प्रकाश म्हसकर तसेच पुनमचा भाऊ क्रिकेटपटू वैभव हिलम आदी उपस्थित होते. दरम्यान, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व अनुसूचित जमाती मोर्चाचे अशोक इरनक, विठ्ठल भांगरे, अनत कोर्डे यांनी ही पूनम चा सत्कार करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -