भिवंडी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांचा गौरव

 भारत सेवा रत्न सुवर्णपदकाने सन्मानित

भिवंडी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी  मिलिंद दिवाकर पळसुले यांनी दोन वर्षाच्या कोरोना काळात  चांगले काम केले. भिवंडी शहरातील सर्व प्रभाग समिती मधील तसेच इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय आणि शहरातील अनेक कोविड सेंटरमध्ये पालिकेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी कोरोनाकाळात डॉक्टर, परिचारिका, अधिकारी आयुक्त, उपायुक्त, महापौर, उपमहापौर आणि सर्व नगरसेवक यांच्यासोबत राहून चांगले काम केले. त्यामुळे त्यांचा महापालिकेच्या  वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला होता.
त्यांच्या या कामाची दखल घेऊन  त्यांना महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन ओडिसा भुवनेश्वरच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे राजदूत डॉ. मनीलाल शिंपी, डॉ. किशोर बळीराम पाटील संपादक दैनिक स्वराज्य तोरण भिवंडी तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व कोकण विभाग सरचिटणीस, भिवंडी पंचायत समितीचे उप सभापती एकनाथ पाटील, भिवंडी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश सज्जन मोहिते, भिवंडी पंचायत समिती तालुका वैद्यकीय अधिकारी माधव वाघमारे, भिवंडी पत्रकार संघाच्या अध्यक्षा कुसुमताई देशमुख, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
त्यावेळी आर एस पी अधिकारी जितेंद्र सोनवणे, आर एस पी अधिकारी, शरद बोरसे, तसेच ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ कुंभार, शरद भसाले,  संजय भोईर संतोष चव्हाण, राजेंद्र काबाडी आदी मान्यवर व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.