घरठाणेसफाई कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्या

सफाई कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्या

Subscribe

भिवंडी महापालिकेत एकूण १ हजार ६०० सफाई कामगार काम करीत आहेत आणि कोरोना कालावधीतही जीवाची पर्वा न करता अथक प्रयत्न करीत शहर स्वच्छ सुंदर करीत आहेत.

भिवंडी महापालिकेतील २५ सफाई कर्मचाऱ्यांना पालिकेने सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देऊन प्रभारी आरोग्य निरीक्षक अशी पदोन्नती दिली होती. परंतु त्यानंतर पुन्हा त्यांची मूळ सफाई कामगार या पदावर बदली केली आणि सफाई कामांचा कोणताही जास्त अनुभव नसलेल्या नवीन सफाई कर्मचाऱ्यांची प्रभारी आरोग्य निरीक्षक आणि मुकादम या पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याने सेवा जेष्ठता असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा सेवा ज्येष्ठतेनुसार नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी भिवंडी म्युन्सिपल कर्मचारी युनियनने पालिका आयुक्त आणि महापौर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. भिवंडी महापालिकेत एकूण १ हजार ६०० सफाई कामगार काम करीत आहेत आणि कोरोना कालावधीतही जीवाची पर्वा न करता अथक प्रयत्न करीत शहर स्वच्छ सुंदर करीत आहेत.

त्यांच्या या कामामुळे स्वच्छ भारत अभियानातही याआधीच्या ३९८ मानांकनावरून २६ मानांकन मिळविले. सफाई कर्मचारी कोणताही जास्त मोबदला न देता ते काम करीत आहेत. अशा २५ कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता लक्षात न घेता त्यांना पदावरून कमी करीत पुन्हा आपल्या सफाई कामगार या मूळ पदावर नियुक्ती करून त्यांच्याजागी सफाई कामाचा कोणताही जास्त अनुभव नसलेल्या नवीन सफाई कर्मचाऱ्यांची प्रभारी स्वच्छता आरोग्य निरीक्षक आणि मुकादम या पदांवर नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे सेवा जेष्ठता असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असल्याने या प्रश्नावर योग्य तो तोडगा काढण्यात यावा. कोरोनाच्या कालावधी असल्याने आणि त्यात आता पावसाळा सुरू होणार असल्याने शहरात पाणी तुंबण्याचे प्रकार जास्त होत असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत पालिकेला अनुभवी प्रभारी आरोग्य (स्वच्छता)निरीक्षक यांची नितांत आवश्यकता असल्याने यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी भिवंडी म्युन्सिपल युनियनने पालिका आयुक्त, महापौर यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -