घरठाणेअनामत रक्कम परत देण्यास नकार, भाडेकरूचा खोली मालकावर हल्ला

अनामत रक्कम परत देण्यास नकार, भाडेकरूचा खोली मालकावर हल्ला

Subscribe
उल्हासनगर – उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील मराठा विभाग या ठिकाणी राहणारे यशवंत लक्ष्मण सपकाळे यांनी आपली खोली भाड्याने दिली होती. त्यासाठी संजय जाधव यांच्याकडून २३ हजार ५०० रुपये अनामत रक्कम आणि एक महिन्याचे आगाऊ भाडे घेतले होते. ही अनामत रक्कम परत मागितले असता खोलीमालकाने परत केले नाही. त्यामुळे संतापलेल्या भाडेकरूने खोली मालकाला जबर मारहाण केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅंप नंबर चार येथील मराठा विभाग येथे राहणारे यशवंत सपकाळे यांनी आपली खोली संजय जाधव यांना अनामत रक्कम व एक महिन्याचे अगाऊ भाडे घेऊन भाड्याने दिली. परंतु जाधव यांना ती खोली पसंत पडली नाही. म्हणून दिलेली रक्कम परत मांगितली. तेव्हा सपकाळे यांनी रक्कम परत देण्यास नकार दिला. हाच राग संजय जाधव याला आला. दरम्यान सपकाळे यांची दुसरी खोली मानेरे गावात असल्याने जाधव याने सपकाळे यांना खोली बघायची आहे. या बहाण्याने बोलवले तर सपकाळे व त्याचा मुलगा मानेरे गावात गेले असता जाधव याने आपल्या चार सहकाऱ्याच्या मदतीने सपकाळे व त्याच्या मुलाला त्या खोलीत बंद करून जबर मारहाण केली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -