घरक्राइमVideo: डोंबिवलीमध्ये क्लीनअप मार्शल महिलेने दारूड्याच्या पोटात चाकू खुपसला

Video: डोंबिवलीमध्ये क्लीनअप मार्शल महिलेने दारूड्याच्या पोटात चाकू खुपसला

Subscribe

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून कंत्राटी पद्धतीवर नेमण्यात आलेल्या क्लीनअप मार्शलची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी सकाळी डोंबिवली पूर्वेतील महावीर नगरात कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून एका महिला क्लीनअप मार्शलने एकावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात ५० वर्षीय इसम जखमी झाला असून डोंबिवली पोलिसांनी याप्रकरणी परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.

कल्याण डोंबिवली शहर स्वच्छ रहावे, तसेच नागरिकांना शिस्त लागावी यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने कंत्राटी पद्धतीवर क्लीनअप मार्शल नेमले आहे. मात्र नेमण्यात आलेल्या या क्लीनअप मार्शलाकडून सर्रासपणे नागरिकांची लूट सुरु असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस दरबारी दाखल झालेल्या आहेत. त्याच बरोबर या क्लीनअप मार्शलची दादागिरी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली असून हे क्लीनअप मार्शल नसून महानगरपालिकेचे वसुली गुंड असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. बुधवारी या क्लीनअप मार्शलची गुंडगिरी डोंबिवली पूर्वेत समोर आली आहे. बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये एक महिला क्लीनअप मार्शल एका ५० ते ५५ वर्षीय इसमाला मारहाण करून चाकूने हल्ला करीत असल्याचे दिसत आहे, तसेच मी माझ्या बचावासाठी हे पाउल उचलले असे हि महिला क्लीनअप मार्शल आपली बाजू मांडत असताना व्हिडिओत दिसत आहे.

- Advertisement -

FB_डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार;

डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार; कचरा रस्त्यावर टाकल्याने वाद, स्वच्छता मार्शल महिलेला पुरुषाने केली मारहाण

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, October 22, 2020

 

- Advertisement -

मात्र मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे डोंबिकरामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवलीया पूर्वेतील महावीर नगर येथे कचरा टाकण्यावरून महिला क्लीनअप मार्शल आणि एका ५० वर्षीय व्यक्तीचा वाद झाला या वादातून या महिला क्लीनअप मार्शलने या व्यक्तीवर चाकूने हल्ला केला असून या हल्ल्यात सदर व्यक्ती किरकोळ जखमी झाली. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात परस्परविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती डोंबिवली पोलीस ठाण्याचे पोनि एन .जाधव यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -