घरठाणेवाढत्या उन्हामुळे तब्बेतीची अशी काळजी घ्या

वाढत्या उन्हामुळे तब्बेतीची अशी काळजी घ्या

Subscribe

फोर्टिस हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप पाटील यांचे मार्गदर्शन

कल्‍याण येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील चीफ इंटेन्सिविस्‍ट डॉ. संदीप पाटील यांची माहिती
भारतीय हवामानशास्‍त्र विभागाने (आयएमडी) मुंबई व आसपासच्‍या प्रदेशासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवसांत तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या मते, गुरुवार १७ मार्च २०२२ पर्यंत या जिल्ह्यांतील उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता आहे.

उच्‍च तापमानामुळे थकवा येऊ शकतो, विशेषतः व्‍यक्‍ती घराबाहेर अधिक वेळ व्‍यतित करत असेल तर खूपच थकवा येऊ शकतो. सामान्‍य स्थितीमध्‍ये शरीराचे तापमान कमी होण्‍यासाठी आपल्‍याला घाम येतो. उष्‍णतेच्‍या लाटेमध्‍ये अधिक वेळ सूर्यप्रकाशात राहिल्‍याने किंवा उच्‍च तापमानामध्‍ये शारीरिक काम केल्‍याने शरीराचे मुलभूत तापमान वाढते. एखाद्या व्यक्‍तीच्या शरीराचे तापमान १०४ फॅरेड (४० अंश सेल्सिअस) किंवा त्याहून अधिक वाढते तेव्हा उष्माघात होतो. हा आजार सामान्‍यत: उन्‍हाळ्यामध्‍ये अधिक आढळून येतो.

- Advertisement -

उष्‍माघाताची काही सामान्‍य लक्षणे आहेत शरीराचे उच्‍च शरीराचे तापमान, मळमळ, मानसिक स्थितीमध्‍ये बदल, घाम येण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल, श्‍वासोच्‍छ्वास जलद होणे आणि तीव्र डोकेदुखी. उष्‍माघात प्रतिबंध करतो येतो आणि क्‍वचितच जीवनास धोकदायक ठरतो. उपचार न केल्‍यास उष्‍माघाताचा त्‍वरित मेंदू, हृदय, मूत्रपिंड व स्‍नायूंवर परिणाम होऊ शकतो. उपचाराला अधिक विलंब केल्‍यास परिणाम अधिक गंभीर होऊन गंभीर आजार किंवा मृत्‍यू होण्‍याचा धोका वाढतो. व्‍यक्‍तीमध्‍ये उष्‍माघाताची लक्षणे दिसून आली तर त्‍वरित वैद्यकीय उपचार घेणे महत्त्वाचे आहे. विशेषत: एका तासामध्‍ये स्थितीमध्‍ये सुधारणा झाली नाही तर त्‍वरित उपचार घ्‍यावा.

उष्‍माघातावर प्रतिबंध ठेवण्‍याचे उपाय
हायड्रेटेड राहा – पाणी, लिंबू सरबत, फळांचे ज्‍यूस, ताक/लस्‍सी हे सर्वोत्तम निवडी आहेत.
घराबाहेर पडताना छत्री, टोपी व सनग्‍लासेस वापरा.
तापमान अधिक उष्‍ण असताना घराबाहेर पडू नका.
दुपारच्‍या वेळी उत्तम हवा खेळती असलेल्‍या किंवा वातानुकूलित भागांमध्‍ये राहण्‍याचा प्रयत्‍न करा.
सांयकाळच्‍या वेळी तापमान कमी झाले असतानाच मुले व वृद्धांना घराबाहेर जाण्‍यास द्या.
हलके सुती कपडे घाला आणि प्रवास करताना डोके झाका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -